मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

उंच इमारतीच्या खिडकीतून तरुणीने मारली उडी; 'त्या' घरात तिच्यासोबत घडत होतं घृणास्पद कृत्य

उंच इमारतीच्या खिडकीतून तरुणीने मारली उडी; 'त्या' घरात तिच्यासोबत घडत होतं घृणास्पद कृत्य

डेलीमेल फोटो साभार

डेलीमेल फोटो साभार

या मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं व तिच्यावर बलात्कार केल्याचं सांगितलं जात आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

अंकारा, 4 सप्टेंबर : तुर्कीमधील (Turky) अंताल्या भागात इमारतीवरुन उडी मारून स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलीसोबत धक्कादायक  प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. येथे एका 19 वर्षीय मुलीने स्वत:ला वाचवण्यासाठी एका उंच इमारतीवरुन उडी मारली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल (Shocking Video) होत आहे. स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, या मुलीचं अपहरण केल्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितला नेमका प्रकार

लैंगिक अत्याचारानंतर 19 वर्षीय सिरीनने खिडकीतून उडी मारून स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, या मुलीने खिडकीतून उडी मारली, फूटपाथवर उभ्या असलेल्या एका गाडीला धडक देत ती खाली कोसळली. यानंतर लोक तिच्या मदतीसाठी धावून आले. यादरम्यान काही लोकांनी पोलिसांना फोन केला. 30  फूट इमारतीवरुन खाली पडण्यापूर्वी ती मदतीसाठी ओरडत होती. सिरीन फूटपाथवर रक्ताने माखलेल्या अवस्थेत होती, यानंतर पॅरामेडिकल स्टाफनेे स्ट्रेचरच्या मदतीने तिला रुग्णालयात हलवलं. डेलीमेलने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

हे ही वाचा-चहा मागितल्यानं सासूला जबरी शिक्षा; बुलडाण्यातील सुनेचं अमानुष कृत्य आलं समोर

बेशुद्ध होण्यापूर्वी तिने आरोप केला आहे की, इराणच्या काही लोकांनी माझं अपहरण करून शोषण केलं. त्यांनी मला विकण्याचा प्रयत्न केला. सिरीनने उडी मारताना साहिन नावाच्या व्यक्तीने पाहिलं होतं. तो म्हणाला की, मी स्वयंपाक घरात होता, मला ओरडण्याचा आवाज आला. खिडकीत पाहिलं तर ही मुलगी उडी मारत होती. दुसऱ्या एका व्यक्तीने सांगितलं की, आम्ही तिला उडी मारण्यापासून रोखत होता. मात्र ती मदतची याचना करीत होती. या प्रकरणात पोलीस अधिक तपास करीत आहे. अद्याप मुलीच्या प्रकृतीबद्दल काहीच माहिती समोर आलेली नाही.

First published:

Tags: Crime, Rape, Turkey