मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

एकटी महिला पाहून सराईत गुन्हेगार घुसला घरात, डोंबिवलीतील धक्कादायक घटना

एकटी महिला पाहून सराईत गुन्हेगार घुसला घरात, डोंबिवलीतील धक्कादायक घटना

महेश रमेश वाघ ऊर्फ मक्या हा सराईत गुन्हेगार आहे. त्याने जबदस्ती महिलेच्या घरात घुसण्याच्या प्रयत्न केला. त्याने धारधार शस्त्र दाखवत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.

डोंबिवली, 20 डिसेंबर :  डोंबिवली (Dombivali) पश्चिमेतील कोपर परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिला घरी एकटी असल्याचे पाहून परिसरातील सराईत गुन्हेगार महेश वाघ महिलेच्या घरात घुसला आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवून महिलेवर अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला. पीडितेनं पोलिसात तक्रार दिल्यानंतर  आरोपीला अटक करण्यात आली. शुक्रवारी 18 डिसेंबर रोजी संध्याकाळी  5 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. महेश वाघ हा सराईत गुन्हेगार आहे. महिला घरात एकटी असल्याचे पाहून महेश वाघ घरात घुसला होता. त्याला पाहून महिलेने जोरजोरात आरडाओरडा सुरू केला. तिचा आवाज ऐकून लोक महिलेच्या घरासमोर जमा झाले. कर्मचाऱ्यांना दिलासा! कॉन्ट्रॅक्टमध्ये नाही बदलला जाणार तुमचा Permanent Job मात्र, आरोपी महेशला बघून नागरिक पळून गेले. यातून महेशची किती दहशत आहे हे दिसून येते. मात्र, ती महिला घाबरली नाही. तिने विष्णुनगर पोलीस ठाण्यात जाऊन महेशच्या विरोधात तक्रार दिली. अखेर पोलिसांनी आरोपी महेश वाघला बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना शुक्रवारी (18 डिसेंबर) संध्याकाळी पाच वाजता घडली. या घटनेबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वडणे यांनी माहिती दिली आहे. 'आरोपी महेश रमेश वाघ ऊर्फ मक्या हा सराईत गुन्हेगार आहे. त्याने जबदस्ती महिलेच्या घरात घुसण्याच्या प्रयत्न केला. त्याने धारधार शस्त्र दाखवत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्याने महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. महिलेने यासंबंधी तक्रार केल्यानंतर अरोपीला अटक करण्यात आली. या आरोपीवर याआधीही चार गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे”, अशी माहिती त्यांनी दिली.
Published by:sachin Salve
First published:

Tags: डोंबिवली

पुढील बातम्या