मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /ट्रक चालकाची दगडाने ठेचून हत्या; आरोपीच्या एका शब्दामुळे पोलिसांनी केला प्रकरणाचा उलगडा

ट्रक चालकाची दगडाने ठेचून हत्या; आरोपीच्या एका शब्दामुळे पोलिसांनी केला प्रकरणाचा उलगडा

भिवंडीत ट्रक चालकाचा दगडाने ठेचून खून करणारा गुन्हेगार एका शब्दामुळे अडकला पोलिसांच्या जाळ्यात ..  

भिवंडीत ट्रक चालकाचा दगडाने ठेचून खून करणारा गुन्हेगार एका शब्दामुळे अडकला पोलिसांच्या जाळ्यात ..  

भिवंडीत ट्रक चालकाचा दगडाने ठेचून खून करणारा गुन्हेगार एका शब्दामुळे अडकला पोलिसांच्या जाळ्यात ..  

भिवंडी, 14 जून : बाईक आणि पैसे चोरी करण्याच्या उद्देशाने कंटेनर (ट्रक) चालकाचा खून करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद करण्यात भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. विशेष म्हणजे खून करून फरार झालेल्या गुन्हेगाराने कुठलाही सुगावा घटनस्थळी सोडला नव्हता. मात्र लुटमार करताना या गुन्हेगाराने उच्चारलेला एक शब्द त्याच्या गुन्हा पकडण्यास कारणीभूत ठरला. त्या एका शब्दातून पोलिसांनी त्याला शोधून काढलं. तसेच त्याच्यासह एका 17 वर्षीय अल्पवयीन आरोपीलाही ताब्यात घेतलं आहे.

किरण नथ्थु पाटील (वय, २७  रा.  शेलारगांव, ता. भिवंडी) असे गुन्हेगाराचे नाव आहे. तर आझम शाबल अन्सारी (वय २८  रा. बांदा, मुंबई) असे दगडाने ठेचुन खून झालेल्या ट्रक चालकाचं नाव आहे.

चालकाला गंभीर जखमी करून आरोपी फरार

मृत चालक हा साथीदारासह भिवंडी जवळील काल्हेर येथील राजलक्ष्मी कम्पाऊंडमध्ये ३० मे रोजी रात्रीच्या सुमारास ट्रक रस्त्याच्या कडेला उभा करून ट्रकच्या कॅबिनमध्येच झोपले होते. त्यावेळी आरोपी व त्याचा अल्पवयीन साथीदार चोरी करण्याच्या उद्देशाने एका दुचाकीवरून ट्रकजवळ आले. त्यांनतर अचानक ट्रकच्या कॅबिनमध्ये घुसून चालकाला धमकी देत शिवीगाळ करू लागले. हे पाहून इतर दोन ट्रक चालक पीडित चालकाच्या मदतीला धावले. यावेळी आरोपी "हम गांववाले है किधर भी घुमेंगे तु क्या करेंगा'' असे बोलत वाद घालून निघून गेला. त्यानंतर मात्र आरोपी पुन्हा ट्रकजवळ आला आणि रागाच्या भरात चालकाच्या डोक्यात दगड घातला आणि पळ काढला. या चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा-Weed Brownies ची इन्स्टाग्रामवर Ad; ड्रग्ज रॅकेटमध्ये 20 वर्षांची मास्टरमाइंड

सापळा रचून पोलिसांनी अडकवलं जाळ्यात

मृत चालकाचा साथीदार सत्यप्रकाश सदाशिव मिश्रा (वय ३८) याच्या फिर्यादीवरून नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्यासह स.पो.निरी. महेंद्र जाधव, पोलीस उपनिरीक्षक शरद बरकडे , सहाय्यक पोलीस निरीक्षक लतिफ मन्सुरी यांनी पथकासह परिसरात राहणाऱ्या रेकॉडवरील गुन्हेगार व फिर्यादीशी झालेले आरोपीचे संभाषण आणि वर्णन यावरून तपास सुरु केला. त्यानंतर मिळलेल्या बातमीनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने भिवंडीतील शेलार नाका परिसरात सापळा रचून आरोपी किरण व त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेऊन चौकशी केली. यावेळी त्याने खुनाची कबुली दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी दिली.

First published:
top videos

    Tags: Bhiwandi, Crime news, Murder