जेवण बनविण्यावरून भांडण, ट्रक ड्रायव्हरने केला क्लिनरचा खून

जेवण बनविण्यावरून भांडण, ट्रक ड्रायव्हरने केला क्लिनरचा खून

पोलिसांनी खाक्या दाखवताच राकेशने हा संपूर्ण खूनाचा प्रकार पोलिसां समोर उघडकीस आणला आहे. रागाच्या भरात आपण बाकेलालच्या छातीत चाकू खुपसला अशी कबुली त्याने दिलीय.

  • Share this:

लोणावळा 22 फेब्रुवारी : ट्रक चालक आणि क्लिनरच्या भांडणात चालकाने आपल्याच सहकाऱ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. या ड्रायव्हरने रस्त्याच्या

कडेला आपला ट्रक उभा केला होता. स्वयंपाक बनविण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा स्वयंपाक कुणी बनवावा यावरून त्यांच्यात वाद झाला. वादाचं रुपांतर भांडणात आली भांडणाचं रुपांतर हत्येत झालं. ही हत्या लपविण्यासाठी त्या ड्रायव्हरने बनावही केला मात्र त्याचा तो प्रयत्न फोल ठरला आणि पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

बाकेलाल ओझा असं खून झालेल्या क्लिनरचं नाव आहे. तर या प्रकरणी त्याचा सहकारी ट्रक चालक राकेश यादव याला पोलिसांनी अटक केली आहे. खून केल्यानंतर स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन मारेकरी राकेश याने कुणीतरी अज्ञात व्यक्तीने माझ्या सहकारी ट्रक चालकाचा खून केला असल्याची बतावणी केली. परंतु पोलिसांचा संशय राकेश वर बाळगल्याने तपासादरम्यान फिर्यादीच आरोपी निघाला.

‘प्रहार’नेत्याच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक, उद्या अकोट बंद

पोलिसांनी खाक्या दाखवताच राकेशने हा संपूर्ण खूनाचा प्रकार पोलिसां समोर उघडकीस आणला आहे. रागाच्या भरात आपण बाकेलालच्या छातीत चाकू खुपसला अशी कबुली त्याने दिलीय. पोलिस इतर ट्रकचालकाचीही चौकशी करत असून नेमकं कारण काय आहे याचा शोध घेत आहेत.

गुजरातमध्ये जे झालं त्याची आठवण ठेवा, वारिस पठाणला भाजप नेत्याचा इशारा

किरकोळ वादातूनच ही हत्या झाली की अन्य काही कारण आहे हे तपासावरूनच सांगता येईल अशी माहिती पोलिसांनी दिलीय. या मार्गावर मोठ्या प्रमाणात ट्रकची वाहतूक होत असते. त्यामुळे ट्रक चालकांच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे.

First published: February 22, 2020, 3:50 PM IST

ताज्या बातम्या