मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /ट्रिपल मर्डरने शहर हादरलं, एकाच कुटुंबातल्या 3 जणांची गोळी मारून हत्या

ट्रिपल मर्डरने शहर हादरलं, एकाच कुटुंबातल्या 3 जणांची गोळी मारून हत्या

या घटनेमुळे पोलिसही हादरून गेलं आहे. फरार झालेले हे आरोपी कुठल्या टोळीचे आहेत का याचाही शोध घेतला जात आहे.

या घटनेमुळे पोलिसही हादरून गेलं आहे. फरार झालेले हे आरोपी कुठल्या टोळीचे आहेत का याचाही शोध घेतला जात आहे.

या घटनेमुळे पोलिसही हादरून गेलं आहे. फरार झालेले हे आरोपी कुठल्या टोळीचे आहेत का याचाही शोध घेतला जात आहे.

कासगंज 26 जुलै: उत्तर प्रदेशातल्या (Uttar Pradesh)  कासगंजमध्ये (Kasganj)  रविवारी एकाच कुटुंबातल्या 3 जणांची गोळीमारून हत्या करण्यात आली. या ट्रिपल मर्डरच्या (Triple Murder) घटनेने शहर हादरून गेलं आहे. आर्थिक वादातून हे हत्याकांड घडविण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या गोळीबारात 1 जण गंभीर जखमी झाला असून त्याला अलिगडच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. गोळीबारानंतर सर्व आरोपी फरार झाले आहेत.

ही घटना सोरों कोतवालीतल्या होडलपूर इथे घडली आहे. या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये प्रेम सिंह, भूपेंद्र सिंह आणि राधा चरन अशी त्यांची नावे आहेत. या घटनेनंतर सर्व शहरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी गस्त वाढवली आहे. या गोळीबाराचं नेमकं कारण हे कळू शकलेलं नाही.

आरोपी हे  एका गाडीमध्ये आलेत आणि ते पीडित कुटुंबाच्या घरी गेले. घरात सर्व मंडळी बसलेली होती. घराच्या अंगणात प्रवेश करताच त्यांनी अंधाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सगळं कुटुंबच भयभीत झाले. नेमकं काय होत आहे हे कुणालाच कळत नव्हतं. सगळेच सैरावैरा धावत सुटले होते. मात्र आरोपींचा गोळीबार सुरुच होता.

त्यांच्या गोळ्यांनी तिघांचा वेध घेतला आणि ते जागीच ठार झाले. गोळीबाराचा आवाज आणि त्यानंतरच्या किंकाळ्या या बाहेर गेल्याने लोकांचा जमाव घराकडे येत होता. ते पाहाताच सर्व आरोपी जीपमधून पसार झालेत.

लग्नानंतर अवघ्या 15 दिवसांतच नववधूनं ठोकली धूम, समोर आलं धक्कादायक कारण...

या घटनेमुळे पोलिसही हादरून गेलं आहे. यात एक अख्ख कुटूंबच संपल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी 5 पथकं स्थापन केली आहेत. हे आरोपी कुठल्या टोळीचे आहेत का याचाही शोध घेतला जात आहे.

First published: