मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

सावत्र पित्याची हत्या करून तुरूंगात गेलेल्या तृतीयपंथीयाने केला 'हा' भयंकर प्रकार

सावत्र पित्याची हत्या करून तुरूंगात गेलेल्या तृतीयपंथीयाने केला 'हा' भयंकर प्रकार

अमेरिकेतील न्यू जर्सी येथील 30 वर्षीय डेमी मायनर या तृतीयपंथीय कैद्याने सावत्र वडिलांची चाकू भोसकून हत्या केली. जेलमध्ये गेल्यावर या आरोपीनं आणखी भयंकर प्रकार केला जो पाहून सगळ्यांनाच धक्का बसला.

अमेरिकेतील न्यू जर्सी येथील 30 वर्षीय डेमी मायनर या तृतीयपंथीय कैद्याने सावत्र वडिलांची चाकू भोसकून हत्या केली. जेलमध्ये गेल्यावर या आरोपीनं आणखी भयंकर प्रकार केला जो पाहून सगळ्यांनाच धक्का बसला.

अमेरिकेतील न्यू जर्सी येथील 30 वर्षीय डेमी मायनर या तृतीयपंथीय कैद्याने सावत्र वडिलांची चाकू भोसकून हत्या केली. जेलमध्ये गेल्यावर या आरोपीनं आणखी भयंकर प्रकार केला जो पाहून सगळ्यांनाच धक्का बसला.

मुंबई, 19 जुलै: तुरूंगामध्ये चालणाऱ्या गैरप्रकारांबद्दल विविध माध्यमांतून अनेकदा चर्चा होत असते. तुरुंगात हाय प्रोफाईल कैद्यांना व्हीआयपी सुविधा मिळाल्याच्या बातम्या वाचण्यात येतात. परंतु, अमेरिकेतील न्यू जर्सी येथील महिला तुरूंग सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. येथे शिक्षा भोगत असलेल्या एका तृतीयपंथीय कैद्याने दोन महिलांना गर्भवती केल्याचा प्रकार नुकताच उघड झाला आहे. त्यामुळे तिथून काढून त्या तृतीयपंथीय कैद्याला पुरुषांच्या तुरुंगात नेण्यात आलं आहे. ‘आज तक हिंदी’ने या संदर्भातील वृत्त दिलं आहे. अमेरिकेतील न्यू जर्सी येथील 30 वर्षीय डेमी मायनर या तृतीयपंथीय कैद्याने सावत्र वडिलांची चाकू भोसकून हत्या केली. या प्रकरणात डेमीला सुरुवातीला एप्रिल महिन्यात एडाना महान करेक्शनल फॅसिलिटी फॉर वूमेन येथे तुरूंगात ठेवलं होतं. तिथे डेमीने दोन सहकारी महिला कैद्यांना प्रेग्नेंट केल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला. त्यानंतर त्याला काही काळासाठी न्यू जर्सीतील तुरूंगात  ठेवलं गेलं. याचदरम्यान आपल्यावर सहकारी कैद्यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप डेमीने केला. आता डेमीला स्टेट यूथ करेक्शनल फॅसिलिटीच्या  ठिकाणी नेण्यात आले. तिथेही डेमीकडून लैंगिक अत्याचाराच्या आरोपांची मालिका सुरू आहे. हेही वाचा - एकाच कंपनीत काम करायचे, शेजारी राहायचे पण एक दिवस...; पुण्यात शेजाऱ्याकडून 65 वर्षीय महिलेची हत्या दरम्यान, एका तुरुंगातून दुसरीकडे नेत असताना सुरक्षारक्षकांनी त्याला शिवीगाळ केल्याचं त्याने म्हटलं आहे. तपासणीसाठी डेमीने एका महिला कर्मचाऱ्याला बोलवण्याची मागणी केली तेव्हा त्याची थट्टा करण्यात आल्याचा दावा ‘जस्टीस4डेमी’ या ब्लॉग पोस्टमध्ये करण्यात आला. तुरूंगातून नेत असताना मारहाण झाल्याचा दावाही अन्यत्र एका पोस्टमध्ये करण्यात आला. डेमीवर अनेक प्रकारच्या गुन्ह्यांचा आरोप
डेमी ज्या तुरूंगात आहे, तेथील परिस्थितीची जाण असणाऱ्या एका व्यक्तीने तुरुंगामधील वातावरणाबद्दल ‘डेमी मेल’ला माहिती दिली. मनोरंजनासाठी कैद्यांच्या कोठड्या उघडल्या जायच्या त्याचवेळी एक कैदी दुसऱ्या कैद्याच्या कोठडीत जायचा. अनेकदा तर बाथरुममध्ये जाऊन तिथे लैंगिक संबंध प्रस्थापित केले जात असत. दरम्यान, डेमी 16 वर्षांचा असताना त्याने सावत्र वडिल थियोटिस बट्सची चाकू भोसकून हत्या केली होती. त्यानंतर डेमी न्यूयॉर्कला पळून गेला. येथे पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. कार चोरीच्या संबंधित प्रकरणातही डेमी दोषी आढळल्याची माहिती समोर आली आहे. कारमध्ये बसलेल्या एका दाम्पत्याला डेमीने लक्ष्य केलं होतं. महिलेच्या चेहऱ्यावर पिस्तुल रोखून त्याने कार ताब्यात देण्याची धमकी दिली होती. दाम्पत्याने कारमधील नवजात बाळाला काढून घेताच डेमी त्या कारला घेऊन पळून गेला होता. दरम्यान, तुरुंगात गैरप्रकार घडत असल्याचे भारतातील किस्से आपण खूप ऐकतो वा वाचतो. परंतु, अमेरिकेसारख्या देशातही असे प्रकार होत असल्याने कुठलेही तुरूंग पूर्णपणे सुरक्षित आहेत, असं म्हणता येणार नाही.
First published:

Tags: Crime, Crime news

पुढील बातम्या