• Home
  • »
  • News
  • »
  • crime
  • »
  • मुलांसोबत घराबाहेर पडताच अपार्टमेंटमध्ये आईवर गोळीबार, भिवंडीतील धक्कादायक घटना

मुलांसोबत घराबाहेर पडताच अपार्टमेंटमध्ये आईवर गोळीबार, भिवंडीतील धक्कादायक घटना

भिवंडी तालुक्यातील काल्हेर गावातील दुर्गेश पार्कच्या पाठीमागे असलेल्या जयदुर्गा अपार्टमेंटमध्ये सकाळी ही घटना घडली.

  • Share this:
भिवंडी, 12 जानेवारी : भिवंडीमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.  काल्हेर गावात आपल्या दोन मुलांसह रस्त्याने पायी जात असताना एका महिलेवर दोन अज्ञात तरुणांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडी तालुक्यातील काल्हेर गावातील दुर्गेश पार्कच्या पाठीमागे असलेल्या जयदुर्गा अपार्टमेंटमध्ये सकाळी ही घटना घडली. जयश्री देडे (वय 44 ) असं जखमी झालेल्या महिलेच नाव आहे. जयश्री देडे या आपल्या दोन मुलांसह  रस्त्यावरून जात असताना पाठीमागून दुचाकीवरून दोन अज्ञात हल्लेखोर आले. देडे यांच्याजवळ गाडी थांबवून दोघांनी त्यांच्यावर दोन फायर करून गोळीबार केला. यात देडे यांच्या मानेला  गोळी लागली. गोळीबार केल्यानंतर दोन्ही अज्ञात हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. जखमी अवस्थेत जयश्री देडे यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. गोळीबार झाल्यानंतर तेथील नागरिकांनी त्यांचा पाठलाग केला. मात्र ते दोघे पळून गेले. त्यावेळी त्यांची एक बॅग सापडली आहे. मात्र, अद्याप गोळीबाराचे कारण समजू शकले नाही. पोलिसांचा तपास सुरू आहे. मात्र, काल्हेर गावातील ही दुसरी घटना असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीत नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. नाशिकमध्ये पिता-पुत्रावर हल्ला दरम्यान, नाशिकमध्येही पिता-पुत्रावर चॉपरने घातक हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे.  मोहन राजगुरू आणि त्यांचा मुलगा भूषण राजगुरू या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहे. मोहन राजगुरू हे राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी यांचे पती आहे.  पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.  जखमी पिता-पुत्र रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Published by:sachin Salve
First published: