मेव्हण्यासोबतचे अनैतिक संबंध लपविण्यासाठी आईनं मुलाला फेकलं विहिरीत

मेव्हण्यासोबतचे अनैतिक संबंध लपविण्यासाठी आईनं मुलाला फेकलं विहिरीत

संगीता आणि शरदचे अनैतिक संबंध होते. आपल्या संबंधात मुलगा अडसर होत असल्याने शरद आणि संगीताने मुलाला संपवण्याचा डाव रचला आणि गावाजवळच्या विहिरीत शौर्यला फेकून दिलं.

  • Share this:

किशोर गोमाशे, वाशिम 06 ऑक्टोंबर : आई आणि मुलाचं नातं हे सगळ्यात पवित्र नातं समजलं जातं. आई आपल्या लाडक्या लेकरासाठी काय करत नाही? आई आणि लेकराच्या जिव्हाळ्याच्या कथा अनादी काळापासून आपण ऐकत आहोत. मात्र वाशिम जिल्ह्यात आई आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडलीय. आईनेच पोटच्या पोराला विहिरीत फेकलं आणि दोन दिवस शांत राहिली. त्यानंतर बिंग फुटल्याने सगळ्यांच्याच काळजाचा थरकाप उडाला. या प्रकरणी पोलिसांनी महिला आणि एका संशयीतीला अटक केली असून कलम 302 आणि 201 नुसार गुन्हा दाखल केलाय. संगीता माहुलकर असं त्या निर्दयी आईचं नाव आहे. संगीता या आपल्या 10 महिन्यांचा मुलगा शौर्यला घेऊन आपल्या बहिणीकडे गेल्या होत्या. संगीताचे तिच्या बहिणीच्या नवऱ्यासोबत अनैतिक संबंध होते.  शरद खुरसडे असं त्याचं नाव आहे. दोन दिवस राहून संगीता जेव्हा घरी आल्या तेव्हा तीच्या सोबत शौर्य नव्हता. संगीताच्या नवऱ्याने जेव्हा मुलाबद्दल विचारलं तेव्हा तिने उडवाउडवीची उत्तर दिली.

वाचा - धक्कादायक..आईसोबतच अनैतिक संबध? वडिलांकडून मुलाचा निर्घृण खून

संगीता आणि शरदचे अनैतिक संबंध होते. संगीता ही वारंवार बहिणाीकडे जात असे. तिच्या बिहीणीलाही संशय आला होता. मात्र वारंवार सांगूनही तिचं येणं काही कमी झालं नाही. आपल्या संबंधात मुलगा अडसर होत असल्याने शरद आणि संगीताने मुलाला संपवण्याचा डाव रचला आणि गावाजवळच्या विहिरीत शौर्यला फेकून दिलं.

वाचा - रामलीलेच्या स्टेजवर भाजपच्या नेत्याची 'रासलीला', बारबालांसोबतचा VIDEO व्हायरल

संगीताच्या नवऱ्याला संशय आल्याने त्याने दोन दिवसानंतर पोलिसांमध्ये तक्रार केली. पोलिसांनी आपला खाक्या दाखवल्यानंतर संगीताने मुलाला विहीरीत फेकल्याची कबूली दिली. या कृत्यात शरद खुरसडे हा बहिणीचा नवराही सहभागी असल्याचं तीने सांगितल्यानंतर पोलिसांनी संगीता आणि शरदला अटक केलीय. कलम 302 आणि 201 नुसार गुन्हा दाखल केलाय. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडालीय.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 6, 2019, 7:08 PM IST
Tags: crime

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading