वेल्लोर, 22 फेब्रुवारी : फेसबुकवर भेट झाली आणि प्रेम जुळलं, अशा घटना हल्ली सर्रास घडताना दिसतात. आता TikTok हे नवं माध्यम सुद्धा अनेकांना एकमेकांशी जोडत आहे. पण सोशल मीडियामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाल्याच्या घटनाही अनेकदा कानी पडतात. अशाप्रकारची घटना आता TikTok वर असणाऱ्या एका युजरच्या बाबतीत घडली आहे.
एक विवाहिता टिकटॉकवर बऱ्याचदा व्हिडीओ बनवून पोस्ट करत होती. तर तिच्या व्हिडीओंवर एक युजर नेहमी कमेंट करायचा. त्या कमेंट्सवर ही विवाहिता इतकी भाळली की त्यांच्यात काहीच दिवसाच मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यानंतर सुरूवात झाली तिच्या विवाहबाह्य संबधांना. तिने आपल्या पतीसह 2 मुलांना देखील सोडायची तयारी दाखवली.
घटना तामिळनाडू राज्यातील वेल्लोर जिल्ह्यातील आहे. याठिकाणची 30 वर्षाची एक विवाहित तरूणी काही व्हिडीओ टिकटॉकवर पोस्ट करायची. दुसऱ्या राज्यातील एक 32 वर्षीय तरूण तिच्या व्हिडीओंवर कमेंट्स करायचा.
(हेही वाचा- VIDEO : 'मला मरायचं आहे...', मानसिक छळाला कंटाळून 9 वर्षाच्या मुलाची आईकडे मागणी)
यातूनच सुरू झालेल्या मैत्रीतून त्यांच्या विवाहबाह्य संबधांना सुरूवात झाली. यामुळे पत्नीच्या बदलेल्या स्वभावाचा पतीला संशय येऊ लागला. त्याने तिचा फोन तपासून पाहिल्यावर लक्षात आलं की आपली पत्नी टिकटॉकच्या आहारी गेली आहे. आणखी खोलात गेल्यावर त्याला पत्नीच्या अफेअरबद्दल समजलं आणि त्याच्या पायाखालची जमिन सरकली. एवढं असूनही त्याने तिला समजावण्यचा प्रयत्न केला. अशी चूक न करण्याचा सल्लाही दिला. मात्र ही विवाहिता समजावण्याच्या पलीकडे गेली होती. त्यामुळे त्याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
(हेही वाचा-काळजाचं पाणी होणारी ह्रदयद्रावक घटना,2 वर्षांच्या मुलांसह विवाहितेनं संपवलं जीवन)
पोलिसांनी विवाहिता आणि तिच्या प्रियकराला बोलावून समज दिली आहे. मात्र पती-पत्नीच्या नात्यात आता तेढ निर्माण झाली आहे. दोघांच्या नात्यामध्ये न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत आता त्याला तिच्याकडून घटस्फोट हवा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tiktok