35 फूट उंचावरुन खाली पडला चिमुकला आणि... श्वास रोखून ठेवणारा पाहा VIDEO

चिमुकल्याचा पाय घसरला आणि थेट दुसऱ्या मजल्यावरुन खाली पडला, श्वास रोखणारा पाहा VIDEO.

News18 Lokmat | Updated On: Oct 20, 2019 02:22 PM IST

35 फूट उंचावरुन खाली पडला चिमुकला आणि... श्वास रोखून ठेवणारा पाहा VIDEO

टीकमगड, 20 ऑक्टोबर: दुसऱ्या मजल्यावरुन जर चिमुकला मुलगा खेळता खेळता पडला तर त्याचं काय होईल याचा आपण साधा विचार केला तरी काळजाचं पाणी होतं. मात्र खेळताना एक चिमुकला 35 फूट उंच इमारतीवरुन थेट खाली कोसळला. हा प्रकार पाहताच लोकांनी तोंडात बोटं घातली. याचं कारण म्हणजे इतक्या उंचावरुन पडूनही या चिमुकल्याला काही दुखापत झाली नव्हती. अगदी किरकोळ खरचटलं होतं. इतक्या उंचावरुन पडूनही चिमुकला सुरक्षित असल्याचं कुटुंबियांना कळताच त्यांचा जीव भांड्यात पडला.

चिमुकला दुसऱ्या मजल्यावरुन खाली पडला कसा?

देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय पुन्हा एकदा आल्याच टीकमगड इथे पाहायला मिळालं. पर्व जैन नावाचा 3 वर्षांचा चिमुकला बाल्कनीत खेळत होता. मात्र खेळताना काही कळायच्या आतच तो बाल्कनीतून थेट खाली कोसळला. त्याच वेळी इमारतीखालून पडला. त्याच वेळी वडिलांनी खाली धाव घेतली आणि पाहतात तर त्यांचा मुलगा रक्षामध्ये सुरक्षित होता. सुदैवानं त्याला गंभीर दुखापत झाली नाही. थोडं खरचटलं चिमुकल्यालाल तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. चिमुकल्याच्या सगळ्या टेस्ट नॉर्मल आल्यामुळे घऱच्यांचा जीव भांड्यात पडला.

चिमुकल्याच्या वडिलांना रिक्षाचालकाचे मानले आभार

चिमुकल्याच्या वडिलांनी रिक्षाचालकाचे आभार मानले. जर रिक्षाचालक देवासारखा धावून नसता आला तर आज मोठा अनर्थ घडला असता असं चिमुकल्याच्या वडिलांनी म्हटलं आहे. पर्व बाल्कनीत खेळत होता. खेळता खेळता तो कशावरतरी चढला आणि तोल जावून खाली थेट बाल्कनीतून खाली कोसळला. त्याचवेळी रिक्षावाला जात होता म्हणून पर्वचे प्राण वाचले. असं म्हणत त्याचे वडी भावुक झाले. मात्र त्यांनी रिक्षाचालक आणि देवाचे मनोमन आभार मानले.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक पालकांना धडकी भरली तर या व्हिडिओमुळे पालकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम सोशल मीडियावर सुरू झालं आहे. हा व्हिडिओ पाहताना काळजाचा ठोक चुकल्याशिवाय राहात नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 20, 2019 02:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...