छिंदवाडा, 14 फेब्रुवारी: मध्यप्रदेशातून एका तरुणाच्या अरेरावीचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. मारहाण केल्याप्रकरणी जेलमध्ये जाऊन आलेल्या तरुणाने परतल्यानंतर 'Tiger is Back' अशी केलेली पोस्ट आश्चर्यकारक आहे. यानंतर पोलिसांचा धाक अशा गुंडप्रवृत्तीवर राहिला नाही की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे.
जुन्नारदेव या परिसरातील घटना आहे. याठिकाणी राहणाऱ्या लक्ष्मीनारायण शर्मा या व्यक्तीने त्यांचं दुकान साहू नावाच्या व्यक्तीला भाड्याने दिलं होतं. साहूने त्यातील अर्धं दुकान अकरम सिद्दी आणि त्याच्या मुलांना भाड्याने दिलं. शर्मा याप्रकरणी न्यायालयात गेल्यानंतर संपूर्ण दुकान शर्मा यांना परत केलं जावं असे आदेश कोर्टाने दिले. पण तसं झालं नाही. दुकान रिकामं न केल्याने शर्मा यांनी पुन्हा एकदा कोर्टाचा दरवाजा खटखटवला. आजतकने याबाबत वृत्त दिले आहे.
(हे वाचा-प्रेयसीसोबत पळालेल्या 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल)
यावर कोर्टाने पोलीस, नगरपालिका आणि महसूल अधिकारी यांना दुकान रिकामे करुन ताब्यात घेण्याचे आदेश दिले. शर्मा यांनी असा आरोप केला आहे की, महसूल निरिक्षक अधिकाऱ्यांना जेव्हा ते दुकान दाखवण्यास गेले होते, त्यानंतर अकरम खान आणि त्यांच्या मुलांनी त्यांना मारहाण केली. शर्मा यांच्या मुलीवर देखील त्यांनी हल्ला केला. यानंतर पोलिसांनी दुकान रिकामं करून ते मालकाच्या स्वाधीन केलं आहे.
शर्मा यांनी मारहाणीच्या आरोपाची आणि तक्रारीची खात्री करून घेतल्यानंतर अमीर सिद्दीकी, अकरम सिद्दीकी आणि उबैद सिद्दीकी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या आरोपींना बेल मिळाल्यांनंतर त्यांच्यापैकी एका सोशल मीडियावर टायगर इज बॅक असं स्टेटस पोस्ट केलं आहे. सोशल मीडियावर त्यांचे काही फोटो देखील आहेत, ज्यामध्ये त्यांच्या हातात बंदूक देखील आहे.
(हे वाचा-एकीची अंगठी चोरून दुसरीला केलं प्रपोज, Valentine's Week मध्ये या व्यक्तीचा प्रताप)
शर्मा यांची मुलगी पारुल शर्मा हिने असे म्हटले आहे की अशाप्रकारे बंदुकीसह फोटो पोस्ट करून ते आम्हाला धमकवण्याचा प्रयत्न करत आहेत. फेसबुक आणि इन्स्टाग्रावर या आरोपींनी पोस्ट केली आहे. पारुलही पेशाने वकील आहे, तिने याप्रकरणी कायदेशीर लढाई लढण्याचे ठरवले आहे. तर कठोर कारवाईची मागणीही केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Crime news