Home /News /crime /

अरे देवा, शौचालयाच्या भांड्यात 1 दिवसाच्या बाळाला दिले फेकून, मन हेलावून टाकणारी घटना

अरे देवा, शौचालयाच्या भांड्यात 1 दिवसाच्या बाळाला दिले फेकून, मन हेलावून टाकणारी घटना

रात्री हॉस्पिटल बंद झाल्यावर उशिरा 2 महिला आणि 1 पुरुष एका महिलेच्या पोटात दुखतंय म्हणून आले होते.

    सुमित सोनवणे, प्रतिनिधी दौंड, 31 डिसेंबर : नववर्षाच्या स्वगातासाठी सर्वत्र जल्लोषमय वातावरण आहे. पण, दौंड (Dound) तालुक्यात मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. एका खासगी हॉस्पिटलमधील शौचालयात 1 दिवसाचे नवजात अर्भक (Newborn) सापडले आहे. शौचालयाच्या भांड्यातच या बाळाला टाकून देण्यात आले होते. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दौंड तालुक्यातील यवत या ठिकाणी खासगी हॉस्पिटलमध्ये चक्क शौचालयाच्या भांड्यात जिवंत नवजात अर्भक आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे. मुस्लीम कुटुंबाने घरातच मंदिराची केली स्थापना; दररोज आरती व शंखनादाचा येतो आवाज मिळालेल्या माहितीनुसार, रात्री हॉस्पिटल बंद केल्यानंतर सकाळी हॉस्पिटलचे शौचालयाचा दरवाजा उघडण्यासाठी हॉस्पिटलची नर्स गेली असता पुरूष जातीच एक दिवसच हे अर्भक दिसून आले. शौचालयच्या भांड्याच्या होलच्या बाजूला डोके व पाय वरच्या बाजूला अशा अवस्थेत हे अर्भक आढळून आले आहे. रात्री हॉस्पिटल बंद झाल्यावर उशिरा 2 महिला आणि 1 पुरुष एका महिलेच्या पोटात दुखतंय म्हणून आले होते. या तिघांनी हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या सांगण्यावरून उपचाराचा बहाणाकरून  आले होते. या घटनेमुळे यवतमध्ये खळबळ उडाली आहे. नवीन वर्षांत सुद्धा कांदा रडवणार, जाणून घ्या किती आहे सध्याचा भाव घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी हॉस्पिटलकडे धाव घेतली. नवजात बाळाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची प्रकृती ही सुदैवाने स्थिर आहे. बाहेर थंडीचा कडाका पडला असताना निर्दयीपणे या बाळाला शौचालयाच्या भांड्यात टाकून देण्यात आले होते. हॉस्पिटल प्रशासनाने दिलेल्या माहितीच्या आधारे तिघा संशयितांवर यवत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांचा पोलीस शोध घेत आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या