मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, प्रकृती गंभीर; रक्ताने माखलेल्या अवस्थेत लेकीला पाहून आई हादरली!

3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, प्रकृती गंभीर; रक्ताने माखलेल्या अवस्थेत लेकीला पाहून आई हादरली!

आरोपी अजयने शाळेत येऊन पीडित मुलीला आपण तिचे नातेवाईक असल्याचे सांगितलं होतं. त्यानंतर ...

आरोपी अजयने शाळेत येऊन पीडित मुलीला आपण तिचे नातेवाईक असल्याचे सांगितलं होतं. त्यानंतर ...

चिमुरडी घरी परतली तेव्हा ती रक्ताने माखली होती. लेकीला पाहून आई हादरली.

  • Published by:  Meenal Gangurde

पाटना, 21 ऑगस्ट : बिहारमधील मोतिहारीमध्ये 3 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीच्या आईने सांगितलं की, शेजारी राहणारा एक तरुण तिला घेऊन आला होता. तो अनेकदा खेळण्यासाठी सोबत घेऊन जात होता. मुलगी एका तासानंतर रडत रडत घरी आली. तिच्या प्रायव्हेट पार्टमधून रक्तस्त्राव होत होता. यानंतर मुलीने आईला घडलेला प्रकार सांगितला. यानंतर आई तिला घेऊन रुग्णालयात गेली. चिमुरडीची प्रकृती अद्यापही गंभीर आहे.

ही घटना शनिवारी रात्री संग्रामपूर पोलीस ठाणे हद्दीक घडली. पीडितने कुटुंबीयांना सांगितलं की, दादा घराबाहेर खेळण्यासाठी घेऊन गेला आणि घाणेरडं कृत्य करू लागला. रक्ताने माखलेल्या अवस्थेत चिमुरडी रडत रडत घरी पोहोचली. ती खूप रडत होती, तिला वेदना होत होत्या. मुलीने घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरू केला आहे. आरोपीच्या अटकेसाठी छापेमारी सुरू आहे.

फिरवण्याच्या बहाण्याने मुलीसोबत केलं संतापजनक कृत्य, अल्पवयीन काकाला अटक

नेमकं काय घडलं...

घटनेबाबत पीडितेच्या आईने सांगितलं की, शनिवारी सायंकाळी उशिरा चिमुरडीची आई स्वयंपाक करीत होती. यादरम्यान शेजारील एक तरुण घरी आला आणि मुलीला खेळायला बाहेर घेऊन गेला. एका तासानंतर जेव्हा मुलगी घरी परतली तर ती रक्ताने माखली होती. तिच्या अंगातून रक्तस्त्राव होत होता. ती खूप घाबरली. विचारल्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला.

First published:

Tags: Bihar, Crime news, Rape