• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • बाई..! तिघींचा मजनू एकच आहे माहीतच नव्हतं, तिघी सख्या बहिणी भाळल्या एकावरच आणि मग झालं असं

बाई..! तिघींचा मजनू एकच आहे माहीतच नव्हतं, तिघी सख्या बहिणी भाळल्या एकावरच आणि मग झालं असं

या तिघींना आपल्याला आवडणारा तरुण एकच आहे, याची माहितीही नव्हती. कुटुंबातील सदस्यांना ही बाब माहिती झाली तेव्हा त्यांनी या प्रेमाला विरोध केला. त्यानंतर या तिघीही बहिणी घरातून पळून गेल्या.

 • Share this:
  नवी दिल्ली, 28 सप्टेंबर : प्रेमात पडल्यानंतर कोण किती प्रमाणात वहावत जाऊ शकतं, याचा काही अंदाज लावता येणार नाही. तीन बहिणी एकाच तरुणाच्या प्रेमात (three sisters love) इतक्या वेड्या झाल्या की, त्यांनी सर्व काही सोडून घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतल्याची घटना नुकतीच घडलीय. या तिघींना आपल्याला आवडणारा तरुण एकच आहे, याची माहितीही नव्हती. कुटुंबातील सदस्यांना ही बाब माहिती झाली तेव्हा त्यांनी या प्रेमाला विरोध केला. त्यानंतर या तिघीही बहिणी घरातून पळून गेल्या. एकाच तरुणावर जडलं तीन बहिणींचं प्रेम मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना उत्तर प्रदेशातल्या रामपूर जिल्ह्यातल्या अजीम नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या एका गावात घडलीय. गावात राहणाऱ्या तीन बहिणींचं एकाच तरुणावर प्रेम बसलं. मात्र, त्या तिघी बहिणींना आपापसांत माहितीही नव्हतं की त्यांना आवडणारा मुलगा एकच आहे. या विचित्र प्रेमाची गोष्ट जेव्हा कुटुंबाला कळली, तेव्हा त्यांनी मुलींना त्या तरुणापासून दूर राहण्यास सांगितलं. पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही. हे वाचा - भुजबळ आणि सुहास कांदेंच्या वादात अंडरवर्ल्डची एंट्री, सेनेच्या आमदाराला छोटा राजनकडून धमकी? एके दिवशी अचानक संधी मिळाल्यानंतर तिन्ही बहिणी त्याच तरुणासह घरातून पळून गेल्या. यानंतर त्रस्त कुटुंबीयांनी त्यांच्या मुलींचा शोध सुरू केला. परंतु, 8 दिवसानंतरही त्यांना एकाही मुलीचा शोध लागला नाही. तीन मुलींपैकी दोन अल्पवयीन आहेत तर, एक मुलगी सज्ञान असल्याचं सांगितलं जातंय. हे वाचा - मित्राच्या आईशी असलेले अनैतिक संबंध बेतले जीवावर; डॉक्टरचा हॉटेलमध्ये नेऊन केला मर्डर पोलिसांनी तक्रार दिली नाही लोकलाजेच्या भीतीनं कुटुंबीयांनी आजपर्यंत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली नाही. या प्रकरणी कोणतीही लेखी तक्रार मिळाली तर निश्चितपणे कारवाई केली जाईल, असं पोलिसांचं म्हणणं आहे. प्रेमाचा हा अनोखा किस्सा आता संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. लोक या प्रकारावर आश्चर्य व्यक्त करत आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: