डोंबिवली, 09 डिसेंबर : डोंबिवलीत अनधिकृत बांधकामाच्या नावावर बिल्डरांकडून तब्बल 8 कोटी रुपये उकळण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बिल्डरांनी तक्रार दिल्यानंतर 4 जणांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोंबिवली पूर्वेतील नांदिवली परिसरात काही इमारतींचे काम सुरू आहे. या परिसरात काही वर्षांपासून बिल्डर वर्गीस म्हात्रे, विक्रांत सिंग आणि काही बिल्डर इमारतीचे बांधकाम करीत आहेत. या बिल्डरांना अनधिकृत बांधकामाच्या नावाखाली ब्लॅकमेल करून 8 कोटी रुपये उकळल्याचा आरोप विद्या म्हात्रे, विश्वनाथ म्हात्रे, एकनाथ म्हात्रे आणि सुनील म्हात्रे यांच्यावर करण्यात आला आहे.
पुण्यात अवतरला गवा, चंद्रकांत पाटलांच्या बंगल्याजवळ झाले दर्शन!
या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पत्रकार परिषद घेऊन बिल्डर हितेन वर्गीस म्हात्रे आणि आर्यन विक्रांत सिंग यांनी मागणी केली आहे की, 'सदर महिला आणि तिच्या नातेवाईकांनी वारंवार आम्हाला ब्लॅकमेल करून आतापर्यंत 8 कोटी रुपये घेतले आहेत. त्यामध्ये काही फ्लॅटचा देखील समावेश आहे.'
'या महिलेला आणि त्यांच्या साथीदारांना पोलिसांनी लवकरात लवकर अटक करून आम्हाला न्याय दिला पाहिजे. सदर बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचे वैध करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे बिल्डरांकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे, हा सगळा व्यवहार चेक द्वारे झाला आहे.
केमिकल कंपनीत अग्नितांडव, भीषण स्फोटाने हादरला परिसर, LIVE VIDEO
या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या गुन्ह्याचा निष्पक्ष तपास व्हावा यासाठी या गुन्ह्याचा तपास विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साबळे यांच्याकडे देण्यात आला आहे. याबाबत संजय साबळे यांचे म्हणणे आहे की, 'या प्रकरणात या चौघांविरोधात जी तक्रार करण्यात आली आहे, त्याचा सखोल तपास सुरू आहे. सदर आरोपींनी अटक पूर्व जामिनेसाठी न्यायालयात धाव घेतली आहे. तपास सुरू आहे, कायदेशीर कारवाई केली जाईल.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.