मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /एकाच परिवारातील तिघांचा मृत्यू, आत्महत्या की खून? पोलीस काय म्हणाले?

एकाच परिवारातील तिघांचा मृत्यू, आत्महत्या की खून? पोलीस काय म्हणाले?

फाईल फोटो

फाईल फोटो

एकाच परिवारातील तिघांचा मृत्यू झाल्याने वेगवेगळ्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Varanasi, India

रवि पांडे, प्रतिनिधी

वाराणसी, 26 मे : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढताना दिसत आहेत. आत्महत्येच्याही घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यातच आता उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यात एकाच घरात तीन जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

ही घटना दशाश्वमेध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुन्शी घाट परिसरातील आहे. येथे वडील, मुलगा आणि भाचा यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. पोलिसांनी माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. यानंतर त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच श्वानपथकासह फॉरेन्सिक पथकासह तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दशाश्वमेध घाटाच्या शेजारील गल्लीतील चहा विक्रेते जनार्दन तिवारी (70), त्यांचा मुलगा अंजनी (27) आणि भाचा (8) मुन्शी घाट येथील घरात भाडेकरू होते. सकाळी 10 वाजता जनार्दन यांचा धाकटा मुलगा घरी पोहोचल्यावर ही घटना समोर आली. वारंवार दरवाजाची कडी ठोठावल्यानंतरही आतून आवाज आला नाही, त्यानंतर तो शेजारच्या लोकांसह खिडकीतून आत शिरला. याठिकाणी तिघेजण मृतावस्थेत आढळले. यानंतर एकच खळबळ उडाली.

पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. पोलिसांनी श्वानपथकासह फॉरेन्सिक टीमही तपासाला लावली आहे. काशी पोलिस स्टेशनचे डीसीपी आरएस गौतम यांनी सांगितले की, प्रथमदर्शनी ही घटना विषारी पदार्थ सेवन केल्याने घडल्याचे दिसत आहे. यामुळे तिघांचाही मृत्यू झाला आहे. मात्र, खरे कारण शवविच्छेदनानंतरच कळेल.

जनार्दन हा गाझीपूरचा रहिवासी होता. तो आपल्या मुलांसह येथे राहत होता. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कमकुवत होती, त्यामुळे घरात वारंवार भांडणे होत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या प्रकरणी शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे, जेणेकरून मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकेल. दरम्यान, या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

First published:
top videos

    Tags: Crime news, Death, Local18, Uttar pradesh