Home /News /crime /

बंदुकीचा धाक दाखवून दिवसाढवळ्या दरोडा, दुकानदाराचं उत्तर ऐकून दरोडेखोरही हतबल, पाहा VIDEO

बंदुकीचा धाक दाखवून दिवसाढवळ्या दरोडा, दुकानदाराचं उत्तर ऐकून दरोडेखोरही हतबल, पाहा VIDEO

एका हार्डवेअरच्या (Hardware) दुकानात शिरून दिवसाढवळ्या दरोडा (Loot) पडल्याची घटना समोर आली आहे.

    नवी दिल्ली, 5 सप्टेंबर : एका हार्डवेअरच्या (Hardware) दुकानात शिरून दिवसाढवळ्या दरोडा (Loot) पडल्याची घटना समोर आली आहे. हार्डवेअरचा व्यापार नेहमीप्रमाणे सुरू असताना तीन बंदुकधारी (Three gunmen) दरोडेखोर अचानक दुकानात शिरले. तिथे उपस्थित ग्राहकांना शिविगाळ करत आणि बंदुकीने फायरिंग करत त्यांनी दुकाने लुटले. मात्र दुकानात त्यांना अपेक्षित असणारी रोकडच नसल्यामुळे त्यांचा संताप झाला. असा पडला दरोडा दिल्लीतील खेरा खुर्द परिसरात शनिवारी दुपारच्या सुमाराला तीन दरोडेखोर हार्डवेअरच्या दुकानात घुसले. त्यातील दोघांनी उपस्थित ग्राहकांना शिविगाळ करायला सुरुवात केली आणि तिसऱ्याने हवेत गोळीबार करत शांत राहण्याची धमकी दिली. यावेळी तिथं उपस्थित असणारे एक ज्येष्ठ नागरिक दरोडेखोरांशी वाद घालताना दिसले. त्यानंतर एका बंदुकधारी दरोडेखोराने कॅश काउंटरकडे मोर्चा वळवला. दरोडेखोर आपल्या दिशेनं येत असल्याचं बघतात दुकानदार तिथून उठला आणि खुर्ची सोडून बाजूला उभा राहिला. दरोडेखोराने ड्रॉवरमध्ये कॅश शोधण्याच्या प्रयत्न केला. मात्र त्याला अपेक्षित असणारी कॅश ड्रॉवरमध्ये नव्हती. ते पाहून संतापलेल्या दरोडेखोराने दुकानदाराला जवळ बोलावले आणि कॅश देण्यास सांगितले. मात्र आपल्याकडे कॅश नसून तुम्हाला गोळी मारायची असेल, तर मारा, असे उत्तर दुकानदाराने दिले. दुकानदाराने ड्रॉवरमध्ये असलेली तुटपुंजी कॅश दाखवली. ती कॅश आणि दुकानातील काही वस्तू घेऊन दरोडेखोरांनी तिथून पळ काढला. हे वाचा - पुण्यातील तरुणीला आईच्या रिलेशनशीपचा लागला सुगावा;BFच्या मदतीनं उकळले लाखो रुपये पोलिसांकडून तपास सुरू ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी तीन वेगवेगळी पथकं तयार केली असून रात्रंदिवस ही पथकं दरोडेखोरांचा शोध घेण्याचं काम करत असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र दिवसाढवळ्या राजधानी दिल्लीत घडलेल्या या प्रकारामुळे दुकानदारासोबतच संपूर्ण परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Crime, Delhi

    पुढील बातम्या