Home /News /crime /

Instagram Post करण्याचं होतं वेड; Reels च्या नादात 3 मित्रांचा दुर्देवी मृत्यू

Instagram Post करण्याचं होतं वेड; Reels च्या नादात 3 मित्रांचा दुर्देवी मृत्यू

अनेकजण इन्स्टाग्रामवर रील्स तयार करून लाइक्स आणि शेअर मिळवण्याचा प्रयत्न करतात. या वेडापायी काही तरुण धोकादायक व्हिडीओ शूट करून इन्स्टाग्रामवर (Instagram Post) पोस्ट करतात.

    चेन्नई, 10 एप्रिल : Tamil Nadu: आज काल प्रत्येकाला इंटरनेटवर व्हायरल (Viral On Internet) होण्याची इच्छा असते. अनेकजण इन्स्टाग्रामवर रील्स तयार करून लाइक्स आणि शेअर मिळवण्याचा प्रयत्न करतात. या वेडापायी काही तरुण धोकादायक व्हिडीओ शूट करून इन्स्टाग्रामवर (Instagram Post) पोस्ट करतात. असं करणं सुरक्षित नाही. तमिळनाडूमधून अशीच एक घटना समोर आली आहे. येथे तीन मित्रांनी इन्स्टाग्रामवर रील्स करण्याच्या वेडापायी आपला जीव गमावला. रेल्वे ट्रॅकवर रील्स करायला गेले होते तीन मित्र... 'इंडियन एक्सप्रेस'च्या बातमीनुसार, तमिळनाडूमध्ये राहणारे तीन मित्र प्रसिद्धीसाठी धक्कादायक कृत्य करून बसले. तिघे मित्र विल्लूपुरम चेंगलपट्टीजवळील रेल्वे ट्रॅकवर व्हिडीओ शूट करण्यासाठी पोहोचले होते. गुरुवारी सायंकाळी एग्मोरहून एक पॅसेंजर ट्रेन या रेल्वे ट्रॅकवरुन जात होती. ट्रेन जात असताना तीन मित्रांनी व्हिडीओ शूट करण्याचा विचार केला. यानंतर तिघे मित्र ट्रॅकवर व्हिडीओ शूट करू लागले. त्याचवेळी दुर्देवाने तिघे मित्र ट्रेन खाली आले. व्हिडीओ शूट करण्याच्या वेडापायी दोघांनी जीव गमावला. ही घटना महिंद्रा सिटीजवळी रेल्वे फाटकापासून दीड किलोमीटर लांब घडली. तिघांजही वय 18 ते 23 वर्षांदरम्यान आहे. मृत झालेल्यांपैकी एक तरुण महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. तर दुसरा मजूर होता. तिघे मित्र एकाच भागात राहणारे आहे. हे ही वाचा-आर्मी अधिकारी असल्याचं सांगून 50 जणींसोबत शारिरीक संबंध; दोघींसोबत केला धक्कादायक प्रकार ही घटना समोर येताच एक अधिकारी तेथे पोहोचला. यानंतर तिघांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला. एका तपास अधिकाऱ्याने घटनेबद्दल तिघांचे सोशल मीडिया अकाऊंट चेक केले. यावेळी लक्षात आलं की, तिघांनी यापूर्वीही अशा प्रकारचा व्हिडीओ अपलोड केला आहे.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Instagram post, Social media viral

    पुढील बातम्या