Home /News /crime /

तीन शेतकऱ्यांनी शेतातच सोडले प्राण; भरधाव वेगाने कार रस्त्यावरुन थेट शेतात घुसली आणि...

तीन शेतकऱ्यांनी शेतातच सोडले प्राण; भरधाव वेगाने कार रस्त्यावरुन थेट शेतात घुसली आणि...

सकाळच्या वेळात शेतकरी शेतात राबत होता, तोच..

    सुरज, 14 नोव्हेंबर : गुजरातमधील पाटण जिल्ह्यात शनिवारी एक एसयूवी कार दुर्घटनाग्रस्त होऊन रस्त्यालगत असलेल्या एका शेतात घुसली. यावेळी शेतात तीन शेतकरी काम करीत होते. भरधाव कार त्यांच्या अंगावर गेल्याने त्या तिघांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात राष्ट्रीय राजमार्गावरील कल्याणपूरा गावात शनिवारी सकाळी 8 वाजता घडला. कार इतक्या वेगात होती की रस्त्यावरुन झेप घेत शेतात गेली. इतकच नाही तर शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावरुन गेली. या तिघांचा जागीच मृत्यू झाला. राधनपूर पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, एसयूव्ही कारच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. ज्यामुळे गाडी रस्त्यावर शेतात आली व येथे काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर आली. यामध्ये धनभाई ठाकोर (30), प्रभु ठाकोर (35) आणि नाभा ठाकोर (40) यांचा मृत्यू झाला. मृतदेह पोस्टमार्टमसाठी राधनपूर रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. हे ही वाचा-भारतीय नौदलात खळबळ; महिला अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये घुसून घेतलं चुंबन कच्छ कुटुंबीय करीत होते प्रवास त्यांनी सांगितले की, वाहन चालकाविरोधात कारवाई केली जात आहे. चालक हा एका कच्छ कुटुंबाला घेऊन पालनपूर जात होतो. या अपघातात एअरबॅग उघडल्याने प्रवासी थोडक्यात बचावले आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Farmer, Road accidents

    पुढील बातम्या