मुंबई, 5 फेब्रुवारी : कोरोनामध्ये लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेकांना आर्थिक फटका सहन करावा लागला. सर्व क्षेत्रामध्ये या परिणाम पाहायला मिळाला. अनेक मजुरांनी तर आपल्या गावी जाणं पसंत केलं. अशात अडचणीच्या काळात मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोरोनामुळे मनोरंजन क्षेत्रात आणि बॉलीवूडलाही आर्थिक चणचण सोसावी लागली.
यादरम्यान काम नसल्याने अनेक आत्महत्येच्याही बातम्या पाहायला मिळाल्या. अशातच मुंबईतील एका मॉडेलचा फायदा घेऊन ब्लू फिल्म तयार करण्यात आल्याचं खळबळजनक वृत्त समोर आलं आहे. (Threatens model to shoot nude video )
हे ही वाचा-अवघ्या 40 दिवसात डॉक्टर, इंजिनिअर, MBA ची डिग्री; पोलिसही हैराण!
मॉडेल आर्थिक चणचणीतून जात असल्याने तिच्याकडून ब्लू फिल्म तयार करून घेण्यात आल्या. ऑडिशनसाठी बोलावून हे लोक मॉडेल्सना सेक्स सीन करायला सांगत होते. याला नकार दिल्यानंतर सेटचा आणि सर्व शुटिंगचा खर्च देण्याची जबरदस्ती केली जात. तरीही नकार दिल्यास पोलिसात तक्रार करू अशी धमकी देऊन मॉडेल्सकडून ब्लू फिल्म शूट करुन घेतल्याचे वृत्त समोर आलं आहे. (Threatens model to shoot nude video ) यादरम्यान धमकी देऊन मॉडेल्सकडून अनेक ब्लू फिल्म तयार करुन घेतल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत अद्याप पोलीस तक्रार करण्यात आली वा नाही याबाबत अधिक माहिती अद्याप हाती लागलेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Crime news, Mumbai, Porn video