ठाणे, 18 जानेवारी: साताऱ्यातील अनेकांना नोकरी आणि घराचं आमिष देऊन फसणूक करणाऱ्या भामट्याला अटक करण्यात ठाणे खंडणीविरोधी पथकाला यश आलं आहे. प्रशांत बेडकेर उर्फ अरविंद सोनटक्के असं या ठगसेनाचं नाव आहे. त्यानं आतापर्यंत 16 जणांची तब्बल 1 कोटींनी फसणूक केली असल्याचं तपासातून उघड झालं आहे.
साताऱ्यातील 16 जणांची फसवणूक
साताऱ्यातील शिरवळ परिसरातील तब्बल 16 लोकांची एका भामट्यानं फसवणूक केल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. 16 लोकांची तब्बल 1 कोटी रुपयांनी फसणूक करण्यात आली आहे. फसवणूक करणाऱ्या भामट्याचं नाव प्रशांत बेडेकर उर्फ अरविंद सोनटक्के असं आहे. या भामट्यानं नागरिकांना रिझर्व बँकेत नोकरीचं आमिष दिलं होतं. येवढचं नाही तर काही लोकांना मुंबईतील म्हाडा संकुलात स्वस्तात घरं मिळवून देण्याचं आमिषही दिलं होतं. त्याच्या आमिषावर विश्वास ठेवून लोकांनी त्याच्या बँक खात्यात लाखो रुपये टाकले. मात्र पैसे देऊनही घर आणि नोकरी मिळत नाही. त्यामुळं प्रशांत यानं आपली फसवणूक केल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर बेबीताई सोळेकर यांनी भामट्याविरोधात शिरवळ पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला होता.
ठाण्यातून आरोपीला बेड्या
सातारा पोलिसात प्रशांत याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर सातारा पोलिसांनी या भामट्याची माहिती सर्व पोलिस स्टेशनला दिली होती. ठाणे पोलिसांकडेही त्याची माहिती आली. त्यानंतर ठाणे खंडणीविरोधी पथक आणि सातारा पोलीस समांतर गुन्ह्याचा तपास करत होते. त्यातच ठाणे खंडणीविरोधी पथकाला हा ठकसेन कल्याणमधील खडकपाडा परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून त्याला खडकपाडा परिसरातून अटक केली आहे. त्याला पोलीसी खाक्या दाखवल्यानंतर त्यानं सर्व गुन्ह्याची कबुली दिली आहे.
राज्यात अनेक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल
पोलिसांनी या भामट्याकडे कसून चौकशी केली असता त्यानं साताऱ्यातील गुन्ह्याची कबुली तर दिलीच शिवाय. इतर गुन्ह्याची कबुलीही दिली आहे. त्यानुसार प्रशांत उर्फ अरविंद याच्यावर राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहे. नागपूर येथील रानाप्रताप पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीसह इतर गुन्हे दाखल आहे. नाशिकमधील अंबड पोलिसातही त्याच्यावर गुन्हे दाखल आहे. मुंबईतील समतानगर परिसरातील पोलिसात गुन्हा दाखल आहे. पुण्यातील समर्थ आणि मावळ पोलीस स्टेशनमध्येही त्याच्याविरोधात विविध गुन्हे दाखल आहे. नंदुरबार शहर, आणि औरंगाबाद आदी पोलीस ठाण्यातही त्याच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.
कशी करत होता फसवणूक?
हा भामटा मासिक व वृत्तपत्रातील जाहिरातींमधून ग्राहकांचे मोबाईल क्रमांक मिळवत होता. मोबाईल नबंर घेऊन त्यांच्याशी हा भामटा संपर्क साधत होता. त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना कमी पैसात मुंबईत घर देण्याचं आमिष देत होता. येवढच नाही तर काही लोकांना रिझर्व बँकेत नोकरीचं आमिष त्यानं दिलं. त्याच्या बोलण्यावर लोकांनी विश्वास ठेवला आणि लाखो रुपयांची फसणूक झाली.
हेही वाचा- मृतदेह घरात पडून राहिला पण डॉक्टरांनी नाही दिलं मृत्यू प्रमाणपत्र, कारण...
आदित्य ठाकरेंनी संजय राऊतांना फटकारलं, म्हणाले...