मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /REAL LIFE मधील क्राईम मास्टर गोगो! काहीच सापडलं नाही म्हणून चोरलं लोखंडी गेट, VIDEO पाहून फुटलं हसू

REAL LIFE मधील क्राईम मास्टर गोगो! काहीच सापडलं नाही म्हणून चोरलं लोखंडी गेट, VIDEO पाहून फुटलं हसू

प्रत्येकालाच हसू फुटेल, असा चोरीचा एक अनोखा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. Strange Video of a theft.

प्रत्येकालाच हसू फुटेल, असा चोरीचा एक अनोखा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. Strange Video of a theft.

प्रत्येकालाच हसू फुटेल, असा चोरीचा एक अनोखा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. Strange Video of a theft.

चंदिगढ, 5 ऑक्टोबर : चोरीच्या ठिकाणी काहीच हाती लागलं नाही म्हणून (Thieves steal iron gate as did not get anything else) वैतागलेल्या चोरट्यांनी अखेर तिथलं एक जुनाट लोखंडी गेटच उखडून नेल्याची घटना समोर आली आहे. अंदाज अपना अपना या चित्रपटातील क्राईम गोगो (Crime Master GOGO) या पात्राच्या तोंडी ‘खानदानी चोर हूं, कुछ ना कुछ लेकर जाऊंगा’, हा डायलॉग लोकप्रिय झाला होता. अशाच प्रकारची एका घटना सीसीटीव्हीत (Theft recorded in CCTV) कैद झाली आहे. " isDesktop="true" id="613519" >

चोरले शिरले प्लॉटमध्ये

हरियाणातील फतेहाबादमध्ये एका प्लॉटवर झाडं लावण्यात आली आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी बाहेर गेट लावण्यात आलं असून एक सीसीटीव्हीदेखील तिथं आहे. गेट आणि सीसीटीव्ही पाहून आतमध्ये एखादं बंगलावजा घर असावं असं वाटून दोन चोरटे आत शिरले. बंगल्यातील मिळेल ते साहित्य घेऊन पळ काढायचा आणि ते विकून पैसे मिळवायचे, असा त्यांचा प्लॅन होता. त्यासाठी त्यांनी रात्रीच्या सुमाराला या लोखंडी गेटपाशी त्यांची बाईक थांबवली.

गेटमधून शिरले आत

गेटमधून हे चोरटे आत शिरले. पण आतमध्ये त्यांना चोरण्यासारखं काहीच नव्हतं. आतमध्ये लावलेली झाडं आणि पिकं पाहून त्यांचा भ्रमनिरास झाला. दारूच्या नशेत असणाऱ्या दोघांच्या रागाचा पारा चांगलाच चढला. एवढा धाडसी वगैरे दरोडा घालण्याच्या तयारीने आलेल्या दोघांना आतमध्ये काहीच नसल्याचं पाहून संताप अनावर झाला. त्यामुळे त्यांनी काही ना काही चोरूनच तिथून बाहेर पडण्याचा निर्धार केला.

तोडलं लोखंडी गेट

तिथे चोरण्यासारखी एकच गोष्ट होती, ती म्हणजे लोखंडी गेट. दोघा नशेबाज चोरट्यांनी आपली सर्व ताकद पणाला लावत ते गेट उखडून टाकायला सरुवात केली. काही वेळ प्रयत्न केल्यानंतर त्यांना त्यात यश आलं. त्यांनी ते जुनाट लोखंडी गेट उखडलं आणि ते चोरून तिथून निघून गेले.

हे वाचा- साहेब, मी आत्ताच डबल मर्डर केलाय! मध्यरात्री पोलीस ठाण्यात आली महिला

फुटेज पाहून हसू

चोर लोखंडी गेट चोरून नेतानाचं सीसीटीव्ही फुटेज पाहून या प्लॉटच्या समोर राहणाऱ्या कांता देवी यांना हसू अनावर झालं. समोरचा प्लॉट रिकामा असल्यामुळे त्यांनी तिथं भाजीपाला लावला होता आणि गुरांपासून त्याचं संरक्षण करण्यासाठी  लोखंडी गेट बसवलं होतं. मात्र चोरट्यांनी ते गेट चोरून नेतानाचा व्हिडिओ पाहून हसावं की रडावं तेच कुणाला कळेनासं झालं. या भागात नशेबाज तरुणाचं प्रमाण वाढत असून स्थानिकांनी अनेकदा पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे.

First published:
top videos

    Tags: Crime, Haryana, Theft