मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

चोरट्यांचं भयानक धाडस, एटीएम फोडलं, पैसे पळवण्याची तयारी, मशीनमधून धूर निघाला आणि....

चोरट्यांचं भयानक धाडस, एटीएम फोडलं, पैसे पळवण्याची तयारी, मशीनमधून धूर निघाला आणि....

चोरांनी (Thieves) कटरच्या (cutter) साहाय्याने एटीएम मशीन (ATM Machine) फोडण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा तो प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यामुळे लाखो रुपयांची रक्कम सुरक्षित राहिली.

जळगाव, 27 नोव्हेंबर : राज्यात चोरट्यांची (Thieve) हिंमत प्रचंड वाढल्याच्या अनेक घटना वारंवार समोर येताना दिसत आहेत. गेल्या आठवड्यात जुन्नरमध्ये चोरट्यांनी भर दिवसा एका पतसंस्थेवर दरोडा (Robbery) टाकून रोकड लंपास केल्याची घटना समोर आली होती. विशेष म्हणजे आरोपींनी त्यावेळी केलेल्या गोळीबारात पतसंस्थेच्या व्यवस्थापकाचा मृत्यू (Death) झाला होता. संबंधित घटना ताजी असताना जळगावच्या फैजपूर येथून आणखी धक्कादायक घटना समोर आली आहे. फैजफूर येथे चोरट्यांनी मध्यरात्री एसबीआय (SBI) बँकेचे एटीएम फोडण्याचा (thieves smashed the ATM) प्रयत्न केला. पण त्यांचा तो प्रयत्न अखेर अयशस्वी ठरला.

नेमकं काय घडलं?

संबंधित घटना ही शुक्रवार आणि शनिवारच्या मध्यरात्री घडली. चोरांनी कटरच्या साहाय्याने एटीएममशीन फोडण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा तो प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यामुळे लाखो रुपयांची रक्कम सुरक्षित राहिली. खरंतर आरोपी कटरने एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न करत होते. पण या दरम्यान मशीनमध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे मशीनमधून अचानक धूर यायला लागला. या धुरामुळे चोर घाबरले. त्यांनी तातडीने घटनास्थळावरुन पळ काढला.

हेही वाचा : पुण्यात 52 वर्षीय व्यक्तीचं शाळकरी मुलीसोबत अश्लील कृत्य; आधी कारमध्ये बसवलं मग

नागरिकांची पोलिसांकडे तक्रार

या दरम्यान पहाटेच्या सुमरास एटीएममधून धूर येत असल्याचं काही स्थानिक नागरिकांना समजलं. त्यांनी तातडीने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. तसेच अग्निशमन दलाला देखील या घटनेची माहिती देण्यात आली. सुरुवातीला काही नागरिकांना एटीएममध्ये आग लागल्याचं वाटत होतं. पण नंतर एटीएम मशीनची तोडफोड झालेलं दिसल्यानंतर हे चोरीच्या उद्देशातूनच झाल्याचं लक्षात आलं.

हेही वाचा : घरमालकासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास पत्नीनं दिला नकार, पतीनं घेतला विचित्र निर्णय

पोलिसांकडून तपास सुरु

दरम्यान, संबंधित घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्यासह फैजपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच अग्निशमन दलाचं एक पथकही घटनास्थळी दाखल झालं. अग्निशमन दलाच्या जावानांनी सुरुवातीला पाण्याचा फवारा मारला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. एटीएममध्ये सीसीटीव्ही कॅमेरा देखील आहे. त्यामुळे त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संबंधित घटना कैद झाल्याची आशा पोलिसांनी वर्तवली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहे. पण या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

First published: