धारदार हत्यारं घेवून चोरट्यांच्या गावात धुमाकूळ; तलवारीचा धाक दाखवून अनेक घरांत मारला डल्ला

धारदार हत्यारं घेवून चोरट्यांच्या गावात धुमाकूळ; तलवारीचा धाक दाखवून अनेक घरांत मारला डल्ला

Crime in Kalyan: रात्री दोन ते अडीचच्या सुमारास 7 ते 8 जणांच्या शस्त्रधारी टोळीनं (Thieves with sharp weapon) गावात प्रवेश केला होता. त्यांनी गावांतील तीन घरात चोरी (theft) केली आहे.

  • Share this:

कल्याण, 22 मार्च: कल्याण तालुक्यातील कांबा हद्दीतील पावशेवाडा या गावात एका चोरट्यांच्या टोळीनं (Thieves) अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. 7 ते 8 जणांच्या या टोळी गावात शिरून एका रात्रीत अनेकांच्या घरावर डल्ला (Theft in many houses) मारला आहे. तसेच तलवार आणि कोयत्याचं धाकानं घरात घुसून घरातील महिल्यांच्या अंगावरील दांगिनेही ओढून नेले आहेत. या काही महिलांना किरकोळ दुखापती देखील झाल्या आहेत. ही सर्व घटना घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून याप्रकरणी टिटावाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री दोन ते अडीचच्या सुमारास 7 ते 8 जणांच्या शस्त्रधारी टोळीनं गावात प्रवेश केला होता. त्यांनी गावांतील तीन घरात चोरी केली आहे. या टोळीनं पावशेपाडा गावात शिरल्यानंतर गावात जो दिसेल त्याला शस्त्राचा धाक दाखवत त्यांना लुटलं आहे. इतकंच नव्हे तर या चोरट्यांच्या टोळीनं गावातील प्रकाश भगत, सुभाष भगत आणि हरिभाऊ भोईर यांच्या घरात घुसून महिलांच्या अंगावरील दागिन्यांची लुटमार केली आहे. महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, गाठी, कानातील डुलं काढताना काही महिलांना दुखापतही झाली आहे. ही शस्त्रधारी टोळी गावातील एका घराच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

या टोळीनं गावात प्रवेश करण्याआधी गावाबाहेर राहणाऱ्या चंद्रकांत भगत यांच्या घराबाहेर काही मिळतंय का? याची देखील पाहणी केली होती. पण याठिकाणी चोरट्यांची हाती काही लागलं नाही. म्हणून त्यांनी गावात प्रवेश करत तीन घरावर दरोडा टाकला आहे. यावेळी चोरट्यांनी घरांना बाहेरून कड्या लावून घरातील सदस्यांना तलवारीचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील दागिनं लुटलं आहे. या गावातून बाहेर पडल्यानंतर या टोळीनं एका राजकीय पक्षाचं कार्यालयही फोडलं आहे. तसेच एका शेतकऱ्याला मारहाणही केली आहे.

हे ही वाचा -नागपूर हादरलं! भल्या पहाटे युवकाची दगडानं ठेचून हत्या; दोघं ताब्यात

या चोरीच्या घटनेमुळं गावात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या गावापासून काही अंतरावर म्हारळ आणि गोविली पोलीस चौक्या आहेत. मात्र रात्रीच्या वेळी गस्ती घालणारे पोलीस या गावात येत नसल्यानं या चोरट्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. या गावात जर पोलीस गस्तीवर असते, तर या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं असतं. याप्रकरणी पोलीस सध्या या चोरट्यांचा शोध घेत आहे.

Published by: Akshay Shitole
First published: March 22, 2021, 11:38 PM IST

ताज्या बातम्या