मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /लुटारू आले होते सोनसाखळी चोरायला, झटापटीत झाला व्यापाऱ्याचा खून

लुटारू आले होते सोनसाखळी चोरायला, झटापटीत झाला व्यापाऱ्याचा खून

कुटुंबातील तिघांची हत्या करुन त्याने केली आत्महत्या, हत्याकांडाने गोंदियात खळबळ (प्रातिनिधिक फोटो)

कुटुंबातील तिघांची हत्या करुन त्याने केली आत्महत्या, हत्याकांडाने गोंदियात खळबळ (प्रातिनिधिक फोटो)

भाजी आणण्यासाठी (buy vegetable) बाजारात चाललेल्या व्यापाऱ्यावर (businessman) काही लुटारूंनी (thief) केलेल्या हल्ल्यात त्याचा मृत्यू (Death) झाला आहे.

इंदूर, 16 ऑगस्ट : भाजी आणण्यासाठी (buy vegetable) बाजारात चाललेल्या व्यापाऱ्यावर (businessman) काही लुटारूंनी (thief) केलेल्या हल्ल्यात त्याचा मृत्यू (Death) झाला आहे. पुलावरून चाललेल्या या व्यापाऱ्याच्या गळ्यातली चेन (chain) लुटण्यासाठी लुटारूंनी त्याला चाकूचा धाक दाखवला. या लुटारूंना न जुमानता व्यापाऱ्यानं धैर्यानं त्यांचा सामना करत चार हात करण्याचा प्रयत्न केला. मात्र एकट्या व्यापाऱ्यावर त्या लुटारूंनी चाकूचे वार केल्यामुळे (stabbed) व्यापाऱ्याचा अंत झाला आहे.

अशी घडली घटना

इंदूरमधील भाजी व्यापारी चंदन भावसार नेहमीप्रमाणे होलसेल बाजारातून भाजी आणण्यासाठी चालले होते. केशरबाग ब्रीजवरून ते चालले असताना वाटेत काही बद्माशांनी त्यांना अडवले आणि चाकूचा धाक दाखवला. गळ्यातील चेन काढून दिली नाही, तर मारून टाकण्याची धमकी त्यांना देण्यात आली. मात्र या धमकीला न घाबरता त्यांनी लुटारूंना प्रतिकार करायला सुरुवात केली. या झटापटीत त्यांच्या अंगावर अनेक जखमा झाल्याचं त्यांच्या वडिलांनी सांगितलं. व्यापारी सहजासहजी चेन काढून देत नसल्याचं लक्षात आल्यावर लुटारूंनी त्याच्यावर चाकूचे वार केले. त्यातील काही वार वर्मी लागल्याने भावसार यांचा मृत्यू झाला.

दोन मुलींचे पितृछत्र हरपले

चंदन भावसार यांना दोन मुली होत्या. अचानक घडलेल्या या घटनेने भावसार यांच्या कुटुंबाला जबर धक्का बसला आहे. पुलावरील दिवे बंद असल्यामुळेच आपल्या मुलाचा खून करण्याचं धाडस लुटारू करू शकले, असा आरोप वडिल सत्यनारायण भावसार यांनी केला आहे.

हे वाचा -काबूल एअरपोर्टवर मुंबई लोकलसारखी परिस्थिती;विमानात चढण्यासाठी नागरिकांची झुंबड

पोलीस तपास सुरू

या प्रकरणी अज्ञात लुटारूंविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. केवळ गळ्यातील चेन लुटण्याच्या उद्देशानं ही घटना घडली की त्यामागे आणखी काही वेगळं कारण आहे, या दिशेनंही पोलीस तपास करत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये इंदूरमधील गुंडगिरी आणि लुटालुटीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची तक्रार नागरिक करत आहेत. काही दिवसांपूर्वीच राजेद्र नगर परिसरात एका व्यापाऱ्यावर ब्लेडने हल्ला करण्यात आला होता.

First published:
top videos

    Tags: Indore, Murder, Murder Mystery