मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /20 लाखाची चोरी करून घरातील TV च्या स्क्रीनवर लिहिलं 'I LOVE YOU'; विचित्र प्रकरणाची रंगली चर्चा

20 लाखाची चोरी करून घरातील TV च्या स्क्रीनवर लिहिलं 'I LOVE YOU'; विचित्र प्रकरणाची रंगली चर्चा

घरातून जवळपास 20 लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि दीड लाख रुपये रोख रकमेची चोरी झाली. चोरानं टीव्ही स्क्रीनवर एका मार्करने असं काही लिहिलं की ते वाचून पोलीसही चक्रावले.

घरातून जवळपास 20 लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि दीड लाख रुपये रोख रकमेची चोरी झाली. चोरानं टीव्ही स्क्रीनवर एका मार्करने असं काही लिहिलं की ते वाचून पोलीसही चक्रावले.

घरातून जवळपास 20 लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि दीड लाख रुपये रोख रकमेची चोरी झाली. चोरानं टीव्ही स्क्रीनवर एका मार्करने असं काही लिहिलं की ते वाचून पोलीसही चक्रावले.

    पणजी 26 मे : चोर चोरी करण्यासाठी काहीही शक्कल लढवू शकतो. चोरी केल्यानंतर चोर काहीतरी पुरावा मागे नक्की ठेवतो असंही म्हटलं जातं. तर काही चोर मात्र चोरी करून काही गमतीशीर प्रकारही करतात. गोव्यात एका चोरानं (Goa Robbery) असंच काहीसं केलं , ज्याची चर्चा सध्या सगळीकडे सुरु आहे. याचबद्दल एशियानेट या वेबसाईटवर वृत्त देण्यात आलं आहे.

    दक्षिण गोव्यातील मडगावमधील (Madgaon Town) एका घरात एका चोरानं चोरी केली. या घरातून जवळपास 20 लाख रुपयांचं सामान त्यानं चोरी केलं. पण या चोराला हे घर बहुतेक खूपच आवडलं होतं. कारण चोरी करून जाताना त्यानं एका मार्करनं टीव्ही स्क्रीनवर ‘I LOVE YOU’ (Thief wrote I LOVE YOU On TV Screen) असं लिहीलं होतं. ही चोरी झाली तेव्हा घराचे मालक असीब एक्स ईसी घरी नव्हते. ते दोन दिवसांच्या सुट्टीवर गेले होते.

    विचित्र प्रकरण! मेंढीवर आहे महिलेच्या हत्येचा आरोप; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा

    जाताना अर्थातच घराला कुलुप लावून गेले होते. परत आल्यावर त्यांना आपल्या बंगल्याचं कुलूप तुटलेलं आढळलं. आत जाऊन बघितल्यावर घरातलं मौल्यवान सामान चोरीला गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी मडगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. घरातून जवळपास 20 लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि दीड लाख रुपये रोख रकमेची चोरी झाल्याची माहिती मडगाव पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर सचिन नार्वेकर यांनी दिली. चोरानं टीव्ही स्क्रीनवर एका मार्करने ‘I LOVE YOU’ असं लिहिल्यानं पोलीसही चकित झाले आहेत.

    मंगळवारी मडगाव पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात घराची तोडफोड आणि चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोराचा शोध घेण्यासाठी ठिकठिकाणी छापेमारी केली जात आहे. या प्रकरणाचा वेगाने तपास होत आहे, असंही इन्स्पेक्टर नार्वेकर यांनी सांगितलं. लवकरच चोर सापडेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

    Mumbai: दोन लग्नांनंतर महिलेचा तिसऱ्यावर आला जीव, प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला काटा

    केरळमध्येही मंगळवारी चोरीची एक अनोखी घटना उघडकीस आली. केरळच्या कोल्लम जिल्ह्यात एका बँकेत चोरांनी चोरी केली. या बँकेतून चोरांनी जवळपास 30 लाख रुपयांचं सोनं आणि 4 लाख रुपये लुटून नेले. पण चोरी करण्यापूर्वी चोरांनी एक विशेष गोष्ट केली. या बँकेत चोरी करण्यापूर्वी चोरांनी काही तंत्रमंत्राची पूजा केली असल्याची माहिती आहे. या पूजेसाठी दारुच्या बाटल्या, विड्याची पानं, पिवळा दोरा, छोटं त्रिशूळ, लिंबू आणि अन्य काही गोष्टी वापरण्यात आल्या होत्या. आपल्याकडे सहसा कोणतेही चांगले काम सुरु करण्यापूर्वी देवाची पूजा केली जाते. पण चोरी करण्यापूर्वी अशा प्रकारची पूजा करणाऱ्या या चोराचे किस्सेही भरपूर व्हायरल होत आहेत.

    First published:

    Tags: Theft, Thief