Home /News /crime /

बॅटरी चोरांनी ट्रकचालकाच्या छातीत स्क्रू ड्राइवर भोसकून केली हत्या

बॅटरी चोरांनी ट्रकचालकाच्या छातीत स्क्रू ड्राइवर भोसकून केली हत्या

बार्टो पोलीस विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, ११ आणि १२ वर्षांच्या दोन मुली मंगळवारी बार्टो मिडल स्कूलमध्ये चाकू घेऊन गेल्या होत्या. त्या कोणावर हल्ला करण्याआधी दोघींनी अटक करण्यात आली.

बार्टो पोलीस विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, ११ आणि १२ वर्षांच्या दोन मुली मंगळवारी बार्टो मिडल स्कूलमध्ये चाकू घेऊन गेल्या होत्या. त्या कोणावर हल्ला करण्याआधी दोघींनी अटक करण्यात आली.

पुणे सोलापूर रोडवरील द्राक्ष संशोधन केंद्रासमोर रात्री एक वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

    वैभव सोनवणे, प्रतिनिधी पुणे, 22 नोव्हेंबर : पुण्यात हत्यांचं सत्र सुरूच आहे. कालच्या गोळीबारांच्या घटनांमधून पुणे पोलीस अजून सावरलेले नाहीत तोच हडपसर भागात आणखी एक हत्या झालीय. ट्रकच्या बॅटऱ्या चोरणाऱ्यांनी एका ट्रक चालकाची हत्या केली. बॅटरी चोरताना हटकल्यामुळं या चोरट्यांनी स्क्रू ड्राव्हर ट्रकचालकाच्या छातीत भोसकला. पुणे सोलापूर रोडवरील द्राक्ष संशोधन केंद्रासमोर रात्री एक वाजेच्या सुमारास ही घटना घडली. ट्रकचालकाच्या छातीत स्क्रू ड्राइवर भोसकून दोघे जण पळून चालले होते. दुचाकीवरुन पळून जाणाऱ्या या बॅटरी चोरांना हडपसर पोलिसांनी दोन तासात अटक केलीय. काल बुधवारी चंदननगरमध्ये एका महिलेची गोळी झाडून हत्या करणाऱ्या आली होती. त्याच आरोपीने पोलिसांवरही गोळी झाडली होती. यात पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्या पोटात गोळी लागली आहे. घटनेनंतर त्यांना तात्काळ नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने त्यांच्या थोडक्यात जीव बचावला आहे. यात गजानन पवार यांच्या तोंडाला आणि पायाला गोळी लागली. त्याचबरोबर प्रवीण वाडेकर या रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांवरही फायरिंग करण्यात आली. पण प्रवीण वाडेकर यांनी आपला जीव धोक्यात घालत आरोपीला जागीच ताब्यात घेतलं आहे. ==================
    First published:

    Tags: Pune, Pune crime, चोर

    पुढील बातम्या