Home /News /crime /

भयानक! चोरानं पोलीस अधिकाऱ्याला दातानं चावा घेत पाडला कानाचा तुकडा, परिस्थिती गंभीर

भयानक! चोरानं पोलीस अधिकाऱ्याला दातानं चावा घेत पाडला कानाचा तुकडा, परिस्थिती गंभीर

चोराला पकडून घेवून जात असताना त्याने एका पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला केला आहे. यावेळी आरोपीने आपल्या दाताने संबंधित पोलिसाचा कान चावून कानाचा तूकडाच वेगळा केला आहे.

    चंदीगड, 24 फेब्रुवारी: एका चोरट्याने पोलिसाचा कान चावून स्वतःची सुटका करून घेतल्याचा एक भयानक प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात संबंधित पोलीस अधिकाऱ्याच्या कानाचा तुकडाच बाजूला झाला आहे. एका चोरीच्या प्रकरणात आरोपीला पकडून पोलीस स्थानकात घेवून जात असताना, हा प्रकार घडला आहे. या घटनेत ASI पदावरील पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घटना पंजाबमधील होशियारपूर येथील आहे. संबंधित आरोपीचं नाव बलकार असून तो एक सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर पोलीस स्थानकात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो 15 दिवसांपूर्वीच दुसऱ्या एका गुन्ह्यात जामीनावर सुटून तुरुंगातून बाहेर आला होता. पण तुरुंगातून सुटल्यानंतरही त्याची खोड मोडली नाही. त्याने पुन्हा चोऱ्या करायला सुरुवात केली आहे. यावेळी तो होशियारपूरच्या वॉर्ड क्रमांक 7 मधील एका घरात चोरी करण्याच्या उद्देशाने शिरला. यावेळी तो घरात काही  मौल्यवान वस्तू आहेत का? याची पाहणी करत होता. दरम्यान घराच्या मालकाने घराचा दरवाजा उघडा असल्याचा पाहिला आणि घरात डोकावला. तेव्हा एक व्यक्ती घरात चोरी करण्यासाठी शिरल्याचं त्याच्या लक्षात आलं. तो काही करणार तोपर्यंतच आरोपीने घराला आतून कुलूप लावून घेतलं. तसेच घराच्या छतावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा काही गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी चोराच्या मुसक्या आवळल्या आहे. हे ही वाचा -'बड्डे बॉय'ला जेवण मिळाले नाही, मित्राने मालकाच्या डोक्यावर ठेवला गावठी कट्टा! सदर पोलीस स्टेशनचे एएसआय कौशल चंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बलकारला गाडीत बसवून पोलीस ठाण्यात नेलं जात होतं. त्यावेळी बलकारला हातकडीही घालण्यात आली होती. गाडी काही अंतरावर गेल्यानंतर आरोपीने चालत्या गाडीतून उडी मारली आणि तो शेताच्या दिशेने धावू लागला. त्यानंतर आरोपी बलकारला पोलिसांनी पुन्हा पकडलं. पण यावेळी आरोपी बलकारने संबंधित पोलिसाचा कान चावला आहे. या हल्ल्यात पोलिसाचा कानाचा तुकडाच वेगळा झाला आहे. यानंतर संबंधित पोलीस अधिकाऱ्याला त्वरित रुग्णालयात दाखल केलं आहे. यावेळी इतर पोलिसांनी आरोपीला पकडून लॉक-अपमध्ये ठेवलं असून पुढील कारवाई केली जात आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Panjab

    पुढील बातम्या