रस्त्यावर होता रक्ताचा सडा; प्रेमविवाह केला म्हणून नवविवाहितांची गळा चिरून हत्या

रस्त्यावर होता रक्ताचा सडा; प्रेमविवाह केला म्हणून नवविवाहितांची गळा चिरून हत्या

कोल्हापूरासारख्या भागातही अशा घटना घडलं अत्यंत लज्जास्पद आहे.

  • Share this:

कोल्हापूर, 27 सप्टेंबर :  बेळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील मच्छी गावातील दोन तरुणींची खुरप्याने गळा कापून अज्ञात युवकांनी हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या दोन्ही तरुणींचा अत्यंत निघृणपणे खून करण्यात आला. सायंकाळी साधारण चार वाजता घडलेल्या या घटनेमुळे सर्वांना मोठा धक्का बसला आहे.

राजश्री रवी बंदुर व रोहिणी गंगाप्पा हूलमनी अशी या दोन मृत झालेल्या तरुणींची नावे आहेत. प्रेमविवाहातून ही हत्या झाल्याची बाब सांगितली जात आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार राजश्री व रोहिणी या दोघीही काळे नटी वाघवडे या गावात राहत होत्या. दोघींनी काही महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता. त्यानंतर त्या पतीसह मच्छे गावात राहत होत्या. दुपारच्या वेळेत दोघी गावात फिरायला बाहेर पडल्या.

हे ही वाचा-सासू आणि मेव्हणीची केली हत्या, मृतदेहांसोबत केला SEX, त्याआधी...

त्यावेळी काही जण मोटारसायकवलीवरुन आले व त्यांनी गळा कापून दोघींची हत्या केली. या घटनेनंतर गावात खळबळ उडाली आहे. या दोघींचा गळा खुरप्याने कापल्याचे सांगितले जात आहे. त्या दोघींचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. पोलीस याबाबत अधिक तपास करीत असून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. या दोघींनी प्रेमविवाह केल्या त्याच्या रागातून यांची हत्या केल्याची चर्चा गावात सुरू आहे. पोलीस उपायुक्त विक्रम आपटे यांनी घटनास्थळी भेट देत अधिक चौकशी सुरू केली आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: September 27, 2020, 8:40 AM IST
Tags: kolhapur

ताज्या बातम्या