• Home
  • »
  • News
  • »
  • crime
  • »
  • भिवंडीत 'रात्रीचा खेळ चाले', महामार्गावर रात्रीच्या अंधारात लोखंडी सळईची चोरी आणि...

भिवंडीत 'रात्रीचा खेळ चाले', महामार्गावर रात्रीच्या अंधारात लोखंडी सळईची चोरी आणि...

कंटेनर चालकाला मॅनेज करून लोखंडी सळईचा माल उतरवला जातो आणि तो दुसऱ्या मार्गाने विकला जातो.

  • Share this:
भिवंडी, 02 एप्रिल : भिवंडीत (Bhivandi) गुन्हेगारी घटनांचे सत्र सुरूच आहे. कोनगाव पोलीस (Kongaon Police station) ठाण्याच्या हद्दीत महामार्गावर भल्यामोठ्या कंटेनरमधून सळई चोरीचा धंदा सुरूच आहे. महामार्गावर ट्रक अडवून सराईतपणे सळई चोरी होत असल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  मोनू यादव असं या सराईत गुन्हेगाराचं नाव आहे. रात्रीच्या अंधारात खुलेआम मुंबई - नाशिक महामार्गालगत लोखंडी सळईचा खुलेआम गोरख धंदा सुरू केला आहे. पण पोलिसांचे मात्र दुर्लक्ष होत असल्याने एका सामाजिक कार्यकर्त्याने पोलीस महासंचालक आणि ठाणे पोलीस आयुक्ताकडे लेखी तक्रार केली आहे. Sexual Wellness : हस्तमैथुन करताना पॉर्न पाहवं की नाही? मुंबई-नाशिक महामार्गालगत रांजनोली इथं टाटा आमंत्रण बिल्डिंगच्या जवळ तसंच गोवे येथील एमआयडीसी त्याच प्रमाणे कोनगाव पोलीस ठाण्याच्या बाजूला तर बबुशा इंडस्ट्रियल पार्क इथं आणि मुंबई नाशिक महामार्गावरील ओम साई वजन काटा आहे. अशा पाच  विविध ठिकाणी मोनू  यादव हा खुलेआम कंटेनर, ट्रेलर  तसेच  12 टायर वाल्या मोठ्या गाड्यांमधून सळई तस्करी करून गोरख धंदा करत आहे. जगातला एकमेव भारतीय वंशाचा उद्योजक ज्याच्याकडे आहे कोट्यवधींची 'बुगाटी' कंटेनर चालकाला मॅनेज करून  लोखंडी सळईचा माल उतरवला जातो आणि तो दुसऱ्या मार्गाने विकला जातो. मोनू यादव याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यादव याचा खुलेआम सळईचा गोरख धंदा सुरू असून या सळईच्या वाहनांमुळे अपघाताच्या घटनाही घडल्या आहे.  मोनू यादव या गुन्हेगाराचा गोरखधंदा तात्काळ बंद करावा, अशी मगणी सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस महासंचालांकडे केली आहे.
Published by:sachin Salve
First published: