शिवपुरी, 8 डिसेंबर: एका ट्रेनी पोलीस अधिकाऱ्याच्या (Theft in marriage of police) लग्नातच चोरांनी हात साफ केल्यामुळे पोलिसांनची चांगलीच पंचाईत झाली आहे. ज्या पोलिसांना घाबरून चोर (Police and thief) दूर पळतात, त्या पोलिसांच्याच लग्नात चोर घुसले आणि त्यांनी संधी साधत हात साफ केल्याचं दिसलं. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांच्या लग्नातच जर चोऱ्या होत असतील, तर सर्वसामान्यांचं काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
अशी घडली घटना
मध्यप्रदेशातील शिवपुरी हे शहर गेल्या काही महिन्यांपासून चोऱ्यांसाठी बदनाम झालं आहे. इथं सातत्यानं कुठे ना कुठे चोरी होण्याच्या घटना घडत असतात. काही दिवसांपूर्वी शिवपुरीत नरेंद्र सिंह रावत या तरुण आणि भावी अधिकाऱ्याचं लग्न होतं. नरेंद्रची भारतीय पोलीस सेवेसाठी निवड झाली असून त्याचं ट्रेनिंग सुरू आहे. 6 डिसेंबर रोजी त्याचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. ज्यावेळी स्टेजवर लग्नाचे विधी सुरू होते, त्यावेळी चोर लग्नात घुसले आणि त्यांनी वधूपक्षाच्या खोल्यांमध्ये प्रवेश केला.
केली जबरी चोरी
लग्नाचे विधी सुरू झाल्यानंतर वराकडील सर्व मंडळी कार्यक्रमात व्यस्त होती. वधूकडील बहुतांश मंडळी स्टेजवर किंवा स्टेजच्या आजूबाजूला होती. या संधीचा फायदा घेत काही चोर वधू पक्षाकडे असणाऱ्या खोल्यांमध्ये शिरले आणि तिथल्या बॅगा आणि कपाटांमध्ये असणारे दागिने आणि पैसे घेऊन त्यांनी पोबारा केला. घटना लक्षात आली, तेव्हा फारच उशीर झाला होता. पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून तपास सुरू केला आहे.
हे वाचा- Paytm वर फ्लाइट बुकिंग केल्यास या प्रवाशांना मिळेल बंपर डिस्काउंट, काय आहे ऑफर
ना तक्रार, ना आरोप
घटनेच्या वेळी खोलीत शिरलेल्या अनेकांचे चेहरे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. त्यामुळे वर आणि वधू या दोन्ही पक्षाकडील लोक एकमेकांवर संशय घेत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे या प्रकऱणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. हे प्रकऱण फारसा गाजावाजा न करता मिटवण्याकडे पोलिसांचा कल असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. मात्र पोलिसांच्या लग्नातच चोरी होत असेल, तर सामान्य माणसानं काय करावं, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.