मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /थर्टी फस्टच्या दिवशी 3 पिस्तुल विकण्यासाठी आला होता तरुण, पण...

थर्टी फस्टच्या दिवशी 3 पिस्तुल विकण्यासाठी आला होता तरुण, पण...

 एक तरुण मोठ्या प्रमाणात शस्त्र साठा घेऊन येत असल्याची माहिती एका खबऱ्याकडून मिळाली होती.

एक तरुण मोठ्या प्रमाणात शस्त्र साठा घेऊन येत असल्याची माहिती एका खबऱ्याकडून मिळाली होती.

एक तरुण मोठ्या प्रमाणात शस्त्र साठा घेऊन येत असल्याची माहिती एका खबऱ्याकडून मिळाली होती.

मुंबई, 01 जानेवारी : नववर्षाच्या पूर्व संध्येला मुंबईतील (Mumbai) वांद्रे टर्मिनल रोडवर (Bandra Terminal Road) मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांच युनिटने मोठ्या शिताफीने एका तरुणाला अटक केली. या तरुणाकडून 3 पिस्तुल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्र सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे.

31 डिसेंबरच्या रात्री क्राईम ब्रांचच्या युनिट 8 ने ही कारवाई केली. एक तरुण मोठ्या प्रमाणात शस्त्र साठा घेऊन येत असल्याची माहिती एका खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी वांद्रे टर्मिनल रोड परिसरात सापळा रचला होता. एक तरुण इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये पिस्तुल विकण्यासाठी आला होता. त्याल पोलिसांनी रंगेहाथ पकडले.

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी वाशिममध्ये भीषण अपघात, दुचाकीस्वार जागीच ठार

त्याच्याकडून 1 कार्बन, 5 मॅगझिन, 3 पिस्तुल आणि 15 जिवंत काडतूस सापडले होते.  पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे. त्याच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा कुठून आला, तो कुणाला विकणार होता. याचा तपास पोलीस करत आहे.

कल्याणात थर्टी फर्स्टच्या मध्यरात्री गस्ती दरम्यान गांजा विक्रेत्याला अटक

दरम्यान, कल्याणमध्ये थर्टी फस्टच्या रात्री रंगणाऱ्या ओल्या पार्ट्यावर नजर ठेवण्यासाठी पोलिसांनी ठेवलेल्या कंडोकोट बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान बाजारपेठ पोलिसानी आंबेडकर रोड येथून संशयास्पदरित्या फिरणाऱ्या आवेश मोमीन या सराईत गुन्हेगाराला ताब्यात घेत त्याची झडती घेतली. त्याच्याकडे 1200 ग्राम गांजा पोलिसांना आढळून आला.

नववर्षाच्या पहिली दिवशी दुर्दैवी घटना, वाघिणीसह 2 बछडे मृतावस्थेत आढळले

आवेश हा सराईत गुन्हेगार असून पोलिसानी त्याला अटक केली आहे. त्याने हा गांजा कुठून व कुणाला विक्री करण्यासाठी आणला याचा तपास पोलीस करत आहेत.

First published:
top videos