Home /News /crime /

मंदिरात आढळला गळा चिरलेल्या तरुणाचा मृतदेह, महादेवाच्या पिंडीला घातला रक्ताने अभिषेक?

मंदिरात आढळला गळा चिरलेल्या तरुणाचा मृतदेह, महादेवाच्या पिंडीला घातला रक्ताने अभिषेक?

यामुळे युवकाची अघोरी अंधश्रद्धेतून हत्या झाली असावी अथवा आत्महत्या केली असावी अशी चर्चा होत आहे.

    सचिन जिरे, प्रतिनिधी पैठण, 11 डिसेंबर : औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील पैठण (Paithan)शहरातील गंगेश्वर महादेव मंदिरात कहारवाडा येथील रहिवाशी असलेल्या 25 वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह  आढळून  आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे, तरुणाचा मृतदेह महादेवाच्या पिंडीलगत असल्याने पिंड रक्ताने माखून निघालेली होती. यामुळे युवकाची अघोरी अंधश्रद्धेतून हत्या झाली असावी अथवा आत्महत्या केली असावी अशी चर्चा होत आहे. पैठण शहरातील जुने कावसन येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणाचा तपास सुरू असताना  आजच्या घटनेनं पैठण शहर  हादरले आहे. गोदावरी काठालगत असलेल्या गंगेश्वर महादेव मंदिरात गुरुवारी  पैठण शहरातील कहारवाडा येथील 25 वर्षीय तरुण नंदू देविदास घुंगासे या युवकाचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि तातडीने तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात हलवला. नागपूरमध्ये वेश्यावस्तीवर पोलिसांचा छापा, 10 ते 12 अल्पवयीन मुली असल्याचा संशय मंदिरात पोलिसांना धारदार कटरचा एक तुकडा सापडला असून याच कटरने हत्या किंवा आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मंदिरात असलेल्या पिंडीजवळच नंदू घुंगासेचा मृतदेह हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्यामुळे महादेवाची पिंड सुद्धा रक्ताने माखलेली होती. 6 वर्षांच्या मुलीसह आई मुलांचा सडलेला अवस्थेत आढळला मृतदेह, भिवंडीतील धक्कादायक घटना दरम्यान, मयत नंदू घुंगासे हा पैठण इथं मच्छी मार्केटमध्ये मासे विक्रीचा व्यवसाय करत होता. या युवकाचा मृतदेह ज्या अवस्थेत महादेवाच्या पिंडीवर आढळून आला ते पाहता अघोरी अंधश्रद्धेतून हत्या किंवा आत्महत्या झाली असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस या घटनेचा हत्या व आत्महत्या अशा दोन्ही दिशेने तपास करीत आहेत.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: औरंगाबाद, हत्या

    पुढील बातम्या