ग्वाल्हेर, 18 ऑगस्ट : पीडब्लूडीमध्ये टाइम किपर रविकांत दुबे यांच्या हत्या प्रकरणात मृत व्यक्तीची लहान मुलगी सलोनी व गोळी मारून हत्या (Murder) करणारा पुष्पेंद्र लोधी याला थाटीपुर ठाणे पोलिसांनी रविवारी न्यायालयीन अटकेत तुरुंगात पाठवलं आहे. मुलीने प्रेमात अडथळा आणणाऱ्या वडिलांची हत्या करण्यासाठी प्रियकराचा मित्र पुष्पेंद्र लोधी याला एक लाख रुपयांची सुपारी देण्याचं वचन दिलं होतं. याशिवाय सलोनीने आरोपीसह आणखी एक करार केला होता. यानुसार तरुणी आपल्या प्रियकरासोबत नातं तोडून त्याच्यासोबत संसार थाटेल. (Crime news)
टाइम किपर रविकांत दुबे कलेक्ट्रेटच्या निर्वाचन शाखेशी संबंधित होते. 15 दिवसांपूर्वी घरात संदिग्ध परिस्थितीत गोळी लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. ज्या खोलीत त्यांचा मृत्यू झाला होता, त्या खोलीच्या जवळपास घरातील सदस्य झोपलेले होते. मात्र रविकांतला गोळी कशी लागली, याबाबात कोणाला काहीच कळलं नव्हतं. खोलीत हत्यार न मिळाल्याने रविकांतने आत्महत्या केली नसल्याचं स्पष्ट झालं होतं. त्याशिवाय हत्येमध्ये कुटुंबातील सदस्याचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. पोलिसांनी पीएम रिपोर्ट आणण्यापूर्वी कुटुंबातील सदस्यांच्या वागणुकीवर लक्ष ठेवण्यात सुरुवात केली होती. पोलिसांनी कुटुंबातील सदस्यांच्या मोबाइल सीडीआर काढून हल्लेखोरांचा शोध सुरू केला होता. या प्रकरणात पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला होता. ( young woman planned to kill her father for her boyfriend)
हे ही वाचा-पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती पिता-पुत्रांना अखेर अटक, अघोरी प्रयोगाने पत्नीचा छळ
ती 'थप्पड' ठरली हत्येचं कारण..
सीडीआरमधून मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीची मुलगी सलोनी गेल्या 15 दिवसांपासून एका मोबाइल नंबरवर सातत्याने बोलत होती. परिसरातील लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सलोनीचे प्रमेसंबंध करण राजौरिया याच्यासोबत होते. याबाबत तिच्या वडिलांना कळालं होतं. मात्र ज्या नंबरवरील व्यक्तीशी ती बोलत होती, तो नंबर करणचा नव्हता तर त्याचा मित्र पुष्पेंद्रचा होता. यानंतर पोलिसांनी संशयाच्या आधारावर पुष्पेंद्र लोधी याची चौकशी सुरू केली. त्यांनी रविकांत दुबे यांच्या हत्येची कबुली दिली. आरोपीने सांगितलं की, हत्याचं कारस्थान त्यांचीच मुलगी सलोनीने केलं होतं. वडिलांनी सलोनीला करणसोबत पाहिल्यानंतर त्याला कालशिलात लगावली होती. प्रियकराला कानशिलाक लगावणे सलोनीला आवडलं नव्हतं. यानंतर तिने वडिलांची हत्या करण्याची तयारी सुरू केली. तिने पहिल्यांदा करणला वडिलांची हत्या करण्यास सांगितलं. मात्र त्याने नकार दिल्यानंतर करणचा मित्र पुष्पेंद्र याला हत्या करण्यास सांगितली.
1 लाख देण्यासह लग्नाचं दिलं होतं वचन
सलोनीने पुष्पेंद्र समोर एक विचित्र प्रस्ताव ठेवला होता. वडिलांच्या हत्येनंतर ती करणसोबत ब्रेकअप करून पुष्पेंद्रसोबत लग्न करण्याचं वचन दिलं होतं. याशिवाय 1 लाख रुपये देणार असल्याचंही सांगितलं होतं. यावर पुष्पेंद्र तयार झाला होता. यानंतर रात्री 10 वाजता पुष्पेंद्र सलोनीच्या घरी पोहोचला आणि खालच्या खोलीत लपून बसला. रात्री तिनेच मुख्य दरवाजा उघडाच ठेवला होता. याशिवाय तिच्या पाळीव कुत्र्याला गच्चीवर बंद करून ठेवलं होतं. सलोनीच्या वडिलांवर गोळी झाडल्यानंतर कुटुंबातील लोक जागे झाले. सलोनीने संधी साधून दरवाजा आतून बंद करून घेतला. त्यामुळे गोळी झाडल्यानंतर हल्लेखोर पळून गेल्याचा कोणालाही संशय आला नाही. वडिलांच्या मृत्यूनंतर सलोनी एका मुलीसारखीच रडली आणि डोकं देखील आपटून घेतलं. धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा या सर्व प्रकरणाचा उलगडा झाला तेव्हा तुरुंगात जाण्यापूर्वी सलोनीच्या चेहऱ्यावर वडिलांच्या मृत्यूबद्दल अपराधीपणाची भावना नव्हती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Father, Murder