Home /News /crime /

तरुणाला नग्न करून केली बेदम मारहाण, नंतर चाकूने सपासप वार करून संपवले

तरुणाला नग्न करून केली बेदम मारहाण, नंतर चाकूने सपासप वार करून संपवले

मृत अझहर हा गुन्हेगारी प्रार्श्वभूमीचा होता. त्यावर या पूर्वी अनेक प्रकारचे आरोप झालेले होते.

    सचिन जिरे, प्रतिनिधी औरंगाबाद, 18 सप्टेंबर : एका 23 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करून धारदार शस्त्राने अनेक ठिकाणी भोसकून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आली. या तरुणाचा नग्नावस्थेत मृतदेह झुडुपात फेकून मारेकरी फरार झाले. ही घटना आज सकाळी पडेगाव येथील पवार हाऊस येथे समोर आली. या घटनेने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली असून पोलीस मरेकरीचे शोध घेत आहे. मोहम्मद अझहर मोहम्मद हनिफ वय-23 (रा.अन्सार कॉलोनी) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की, पडेगाव पावर हाऊस जवळील मोकळ्या जागेत आज सकाळी काही नागरिक प्रांतविधीसाठी गेले असता नग्नवस्थेत एक तरुण जखमी अवस्थेत झुडुपात पडलेला दिसला. ही माहिती नागरिकांनी नियंत्रण कक्षाला कळविली व तातडीने पोलीस उप आयुक्त निकेश खाटमोडे, साह्ययक आयुक्त डॉ.दिनेशकुमार कोल्हे, गुणाजी सावंत, गुन्हे शाखेचे निरक्षक अनिल गायकवाड, छावणी पोलीस निरीक्षक मनोज पगारे फॉरेन्सिकचे पथक, डॉग स्कॉड, यांनी घटनस्थळी गाठले. तेथे मृतदेहाची पाहणी केली असता डोक्याच्या पाठीमागील भागात गंभीर जखमी, कंबरेत धारदार वस्तूने भोसकल्याचे व गुडघ्याला, हाता पायांना बेदम मारहाणीचे व्रण आढळून आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला विचारपूस करण्यासाठी ताब्यात घेतल्याचे कळते. मित्राकडे जाऊन येतो म्हणून सांगितले अन्... मृत अझहर हा पहाटे तीन वाजता घरी आला होता. त्यावेळी रोहन या मित्राकडे जाऊन येतो असे घरच्यांना सांगून घराबाहेर पडला. मात्र, तो घरी आलाच नाही सकाळी त्याच्या मृत्यूची बातमी घरच्यांना कळाली. जुन्या वादातून हत्या झाल्याचा संशय मृत अझहर हा गुन्हेगारी प्रार्श्वभूमीचा होता. त्यावर या पूर्वी अनेक प्रकारचे आरोप झालेले होते. त्याचे अनेकांशी वाद होते. जुन्या वादातूनच अझहरची हत्या झाली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: औरंगाबाद

    पुढील बातम्या