लखनऊ, 1 जानेवारी : सहारनपुरमध्ये (Uttar Pradesh News) शनिवारी नवीन वर्षाच्या सुरुवातील भर बाजारात एका तरुणीवर चाकूने वार करून हत्या (Murder) करण्यात आली. आरोप आहे की, तरुणीच्या नात्यात भाचा असलेल्या तरुणाने हे कृत्य केलं. तरुणाने भर बाजारात तरुणीचा हात पकडला. यादरम्यान दोघांमध्ये वाद झाला. यादरम्यान तरुणाने तरुणीवर चाकूने हल्ला केला. लोकांनी पळापळ सुरू करताच आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला. यादरम्यान तरुणीचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. याची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. पोलिसांनी सांगितलं की, तरुणाचं तरुणीवर एकतर्फी प्रेम होतं. मात्र तरुणीचं लग्न ठरलं होतं. यामुळे संतापलेल्या तरुणाने तरुणीची हत्या केली. पोलीस सध्या या प्रकरणात तपास करीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दीपा (22) हिचं लग्न ठरलं होतं. 10 वी पास दीपा ब्युटी पार्लरमध्ये काम करीत होती. शनिवारी सायंकाळी तो पार्लरमध्ये जाण्यासाठी निघाली होती. तरुणी बाजारात पोहोचताच अनुजने भर बाजारात तिचा हात पकडला. पादचाऱ्यांनी सांगितलं की, दोघांमध्ये भांडण सुरू होतं. तरुणी दीपाला लग्नासाठी तयार करण्याचा प्रयत्न करीत होता. हे ही वाचा-कोरोना लशीचं कारण सांगून तरुणाची नसबंदी, काही महिन्यांपूर्वीच झालं लग्न मात्र तरुणीने त्याचा हात झटकला. यानंतर संतापलेल्या तरुणाने दीपावर मागून चाकूने वार केला. दोन ते तीन वेळा तरुणाने दीपावर हल्ला केला. यानंतर ती रस्त्यावर कोसळली. यांतर रस्त्यात गोंधळ उडाला. याचा फायदा घेत तरुणाने तेथून पळ काढला. तरुण नात्यातला... आरोपी अनुज मृत तरुणीच्या नात्यातील असून तो तिचा भाचा लागतो. मृत तरुणीच्या आईने सांगितलं की, गेल्या अनेक दिवसांपासून तो दीपाच्या मागे आहे. या प्रकरणात चार वर्षांपूर्वी त्याच्याविरोधात तक्रारदेखील करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी त्याला पकडलं होतं. मात्र काही दिवसांनी त्याला सोडण्यात आलं. अनुजला दीपासोबत लग्न करायचं होतं. मात्र दीपाच्या कुटुंबीयांना ही बाब आवडत नव्हती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Love, Murder, Uttar pardesh