काटोल, 19 मे : दारूच्या नशेत एका तरुणाला त्याच्या मित्रांनी आधी मारहाण व त्यानंतर गळा कापल्याची घटना समोर आली आहे. त्यावरच त्यांचं समाधान झाले नाही. तर त्या तरुणाच्या अंगावर पेट्रोल व टायर टाकून जीवंत जाळल्याची खळबळजनक घटना काटोल तालुक्यातील सावळी शिवारात घडली़ पुढे आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे़. अंगद उर्फ बिट्टू अशोकराव कडूकर (28) असे मृतकाचे नाव असून आरोपी अक्षय घिचेरिया व मंगेश जिचकार व गणेश नैताम अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत़.
मिळालेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी मृत तरुण अंगद हा गावातील मित्र अमोल नागपूरे आणि वैभव हिवसे यांच्यासोबत दुपारी 3 वाजताच्या सुमारास रिधोरा येथून एमएच 04 एडब्लु 5123 क्रमांकाच्या क्वालिस गाडीने काटोल येथे जेवणा करीता गेले़. यावेळी ते मद्य प्राशन करूनच होते़. झुणका भाकर केंद्रावर ऑर्डरला वेळ असल्याने तिघेही शेजारी एका ठिकाणी बसले. तेथे त्यांनी पुन्हा मद्यप्राशन केले़. जवळच्या टेबलवर अंगदचा व वैभवचा मित्र आरोपी मंगेश जिचकार बसला होता़. त्याच्यासोबत त्यांचा मित्र आरोपी अक्षय घिचेरिया व नैताम बसला होता़. त्यामुळे सहाही जण एकाच टेबलवर मद्य प्राशनासाठी बसले़. दरम्यान वैभवला जास्त झाल्याने जिचकार यांने वैभवला घरी रिधोरा येथे सोडून देऊ असे म्हटले़.
अमोलला झुणका भाकर केंद्रावरच सोडून अंगद, वैभव, अक्षय, मंगेश व नैताम रिधोऱ्याकडे निघाले़. मात्र, ते काटोल बसस्थानकापर्यत पोहचले असता त्यांनी वैभवला बसस्थानक परिसरात सोडून अंगदला डोगरगाव परिसरात घेऊन गेले़. आणि तेथे त्यांच्यांत वाद झाला़. त्यानंतर आरोपींनी अंगदला मारहाण केली व सावळी परब शिवारात नेऊन रस्त्याच्या कडेला फेकून दिले.
हे ही वाचा-जखमी असल्याचं सांगून 90 लाख सोन्याची तस्करी; कस्टम अधिकारीही चक्रावले
आरोपीने स्वत:च हे कृत्य केल्याचे एकाला सांगितले. त्याने कोणाला मारले हे पाहण्याकरीता तिन्ही आरोपी व आणखी दोघे दुचाकीने पुन्हा मृतकला पाहायला त्या जागी गेले तो जिवंत असल्याचे निदर्शनास आले असता अक्षयने सर्व समक्ष चाकूने गळा कापून त्याला ठार केले असल्याचे माहिती साक्षीदाराने दिले. तर पुन्हा परत येऊन तिन्ही आरोपीने पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने दुचाकीने घटनास्थळ गाठले.
पेट्रोल टायरच्या मदतीने मृतकाला जाळले यावेळी अक्षय, गणेश व मंगेश सोबत असल्याची माहिती आहे. रात्र उलटून गेला तरी अंगद घरी न आल्याने घरच्यांनी त्याचा शोध सुरू केला़. अंगद आरोपींसोबत असल्याचे काही व्यक्तींनी सांगितल्याने त्यांची विचारपूस करण्यात आली़. त्यावर अंगद काही वेळाआधीच गेल्याचे आरोपींनी सांगितले़. कुटुंबीयांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात काही गोष्टींबाबत शंका आल्याचं दिसून आलं. अंगद सोबत काही तरी अपरिचीत घडल्याचा संशय बळावला़. दरम्यान देवेंद्र खरपुरीया यांने पोलिसांना माहिती दिली़ की, आरोपीने अंगदची हत्या केली आहे़. तोच पोलिसांनी आरोपींला अटक केली़. त्यानंतर त्याच्या इतर साथीदाराना अटक करण्यात आली़. तिन्ही आरोपींना पुढील तपास उपविभागीय अधिकारी नागेश जाधव व पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर यांच्या मार्गदर्शनात स.पो.नि राहुल बोन्द्रे करीत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Death, Murder