• Home
  • »
  • News
  • »
  • crime
  • »
  • धावत्या कारमध्ये तरुणाने कापून घेतली हाताची नस, खेडमधील थरारक घटना

धावत्या कारमध्ये तरुणाने कापून घेतली हाताची नस, खेडमधील थरारक घटना

धावत्या कारमध्येच त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. हाताची नस कापल्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता.

  • Share this:
खेड, 03 नोव्हेंबर : मुंबई गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) खेडमधील (Khed) भरणे नजीक धावत्या स्विफ्ट कारमध्ये एका तरुणाने ब्लेडने हाताची नस कापून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अखेर, खेडमधीलच काही समाजसेवकांनी पाठलाग करून या तरुणाला पकडले आणि रुग्णालयात दाखल केले. मिळालेल्या माहितीनुसार, खेडमधील भरणेजवळ आज सकाळी 7 वाजता ही घटना घडली. या तरुणाची खेडमधील एका गावात सासुरवाडी आहे.  आज सकाळी भरणे नाका येथून मुंबई गोवा महामार्गावरून हा तरुण साताऱ्याच्या दिशेने जात होता. त्याने सातारा येथील त्याच्या नातेवाईकांना आपण आपलं जीवन संपवत असल्याचे फोन वरून सांगितले. त्यानंतर त्याच्या घरच्यांनी खेडमधील काही ओळखीच्या लोकांना ही माहिती दिली. त्यानंतर खेडमधील काही समासेवक तरुणांनी त्याचा शोध सुरू केला. नगरमधील भाजपचे अनेक नेते लवकरच राष्ट्रवादीत, राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा दावा मारुती स्विफ्ट कारने भरधाव वेगाने भरणे येथून जात असताना तो आढळला. त्यानंतर खेडमधील समाजसेवक तरुणांनी त्याचा पाठलाग सुरू केला असता एक पेट्रोल पंपानजीक त्याला थांबवले.  तरुणांनी जेव्हा त्याच्या कारकडे धाव घेतली तेव्हा आतील दृश्य पाहून सर्वच हैराण झाली. या तरुणाने आपल्या हाताची नस कापून घेतली होती. त्यामुळे गाडीत अक्षरशः  रक्ताचा सडा पडला होता. तरुणाचे कपडे देखील रक्ताने माखले होते. 6 शहरं 6 तास! रस्त्यावर अंदाधूंद गोळीबार करत होते हल्लेखोर, अटॅकचा LIVE VIDEO या तरुणाला तातडीने कारमधून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. धावत्या कारमध्येच त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. हाताची नस कापल्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे त्याला तातडीने कळंबनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहे. हे भयानक कृत्य त्याने का केले याचा आता खेड पोलीस तपास करत आहेत.
Published by:sachin Salve
First published: