Home /News /crime /

लग्नाच्या दोन दिवसानंतर नवरदेवाची आत्महत्या; नवरीचीही परिस्थिती गंभीर

लग्नाच्या दोन दिवसानंतर नवरदेवाची आत्महत्या; नवरीचीही परिस्थिती गंभीर

या घटनेनंतर नवरीला जबर धक्का बसला आहे.

    पाटना, 13 मे : बिहारमधील (Bihar News) मोतिहारी जिल्ह्यात एका तरुणाने लग्नाच्या दोन दिवसांनंतर ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या (Suicide after two days of marriage) केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर पत्नीला जबर धक्का बसला आहे. ही घटना मोतिहारीतील तुरकौलिया पोलीस ठाणे हद्दीतील आहे. बिट्टू यादव याने बुधवारी जवळील रेल्वे स्टेशनजवळील रेल्वे समोर उडी मारून आत्महत्या केली. मृत आपल्या गावातून मोतिहारी येथे बीए प्रथम वर्षांच्या परीक्षेसाठी आला होता. यादरम्यान तो थेट रेल्वे स्टेशनजवळ पोहोचला. आणि बाईक किनाऱ्यावर लावून ट्रेन येण्याची वाट पाहू लागला. ट्रेन जवळ येताच त्याने ट्रॅकवर उडी मारून आत्महत्या केली. या घटनेमुळे पत्नीला जबर धक्का बसला आहे. हे ही वाचा-कोटामध्ये कोचिंगसाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू; खोलीत संशयास्पद आढळलं शव हातावरील मेंदीचा रंगही उतरला नाही, तोच.. मिळालेल्या माहितीनुसार, बिट्टूचं 9 मे रोजी लग्न झालं होतं. पती-पत्नी या लग्नामुळे आनंदीच होते. मात्र पतीच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे कुटुंबाला जबर धक्का बसला आहे. हातावरील मेंदीचा रंगही कमी झाला नाही तोच पत्नीच्या निधनामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरू केला आहे. शिवाय आत्महत्येच्या कारणाचाही शोध घेतला जात आहे. बिट्टूने असं पाऊल का उचललं, याचा विचार करून कुटुंबीयही त्रस्त झाले आहेत. आता कुठे त्याचं नवं आयुष्य सुरू झालं होतं.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Marriage, Suicide

    पुढील बातम्या