पती घरी नसताना प्रेयसीला भेटायला आला तरुण; गावकऱ्यांनी दोघांचाही घेतला समाचार

पती घरी नसताना प्रेयसीला भेटायला आला तरुण; गावकऱ्यांनी दोघांचाही घेतला समाचार

गावकऱ्यांनी दोघांना रंगेहाथ पकडलं आणि दोघांनाही रात्री वीजेच्या पोलला बांधून ठेवलं

  • Share this:

पाटना, 3 मे : लग्नाचं नाव घेताच लोकांच्या डोळ्यासमोर घर, वरात, संगीत, नागिण डान्स असे चित्र फिरू लागते. मात्र बिहारमध्ये एक हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. येथे गावकऱ्यांनी प्रेमी जोडप्याला रात्रभर झाडाला बांधून ठेवलं आणि सकाळी दोघांचं लग्न लावून दिलं. ही घटना बिहारमधील वीरपूर पोलीस ठाणे हद्दीतील तुरकैजनी गावातील आहे. येथे या प्रकाराची सुरुवात रविवारी रात्रीपासून झाली आणि सोमवारी सकाळी जाऊन संपली.

हा संपूर्ण प्रकार प्रेम प्रकरणाशी संबंधित आहे. सांगितलं जात आहे की, रविवारी रात्री एक तरुण तुरकैजनी गावातील महिलेशी रात्री भेटण्यासाठी गेला. जी आधीच विवाहित आहे. तरुणीच्या घरी तिचा पती नसल्याचे कळताच तो लपून-छपून तिच्या घरी पोहोचला. ज्यानंतर गावकऱ्यांनी दोघांना रंगेहाथ पकडलं आणि दोघांनाही रात्री वीजेच्या पोलला बांधलं. सकाळ झाल्यानंतर गावकऱ्यांनी जबरदस्तीने दोघांंचं लग्न लावून दिलं.

हे ही वाचा-लग्न सोडून नवरी पोहोचली निवडणुकीत विजयी झाल्याचं प्रमाणपत्र घ्यायला, मगच सप्तपदी

हा तरुण तरुणीच्या माहेरील घराच्या जवळ राहतो. तरुणीचे पती सकाळी काही कामानिमित्त बाहेर गेले होते. याबाबत कळताच तरुण तिच्या घरी पोहोचला. ज्यानंतर मात्र गावकऱ्यांनी दोघांचा समाचार घेतला. विशेष बाब म्हणजे हा घटना पोलीस ठाण्यापासून 1 किलोमीटर अंतरावर झाली. विवाहिताबाबत सांगितलं जात आहे की, महिलेची 2 वर्षांची मुलगी आहे. तिला महिलेच्या पतीने स्वत:जवळ ठेवले आहे. महिलेने मात्र आपल्या प्रेमीसोबत न राहता पतीसोबत राहायची इच्छा व्यक्त केली आहे. महिलेचं म्हणणं आहे की, गावकऱ्यांनी दबरदस्तीने दोघांचं लग्न लावून दिलं. त्या दोघांमध्ये अनैतिक संबंध नाहीत. गावकऱ्यांना वारंवार सांगितल्यानंतरही त्यांनी ऐकलं नाही. या प्रकरणात पोलिसांचं म्हणणँ आहे की, दोन्ही कुटुंबामध्ये बातचीत सुरू आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: May 3, 2021, 9:47 PM IST

ताज्या बातम्या