मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

गळ्यातील फास आवळत इंजिनिअर तरुणीचा मित्राला फोन, म्हणाली...

गळ्यातील फास आवळत इंजिनिअर तरुणीचा मित्राला फोन, म्हणाली...

मित्राने तातडीने पोलिसांना फोन करून सर्व प्रकार सांगितलं. पोलीस घटनास्थळी पोहोचले, मात्र...

मित्राने तातडीने पोलिसांना फोन करून सर्व प्रकार सांगितलं. पोलीस घटनास्थळी पोहोचले, मात्र...

मित्राने तातडीने पोलिसांना फोन करून सर्व प्रकार सांगितलं. पोलीस घटनास्थळी पोहोचले, मात्र...

  • Published by:  Meenal Gangurde

बिलासपुर, 12 नोव्हेंबर : Bilaspur Crime News: सकरी येथील एका कॉलनीत राहणाऱ्या इंजिनिअर महिलेने गुरुवारी रात्री स्वत:च्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (Women Suicide) केली. आत्महत्येपूर्वी इंजिनियरने आपल्या शाळेच्या मित्राला व्हिडीओ कॉल करून आत्महत्या (Crime News) करीत असल्याचं सांगितलं होतं.

तरुण आणि तिच्या कुटुंबीयांनी तरुणीला समजावण्याचा प्रयत्नही केला होता. यानंतर तरुणीने आत्महत्या केली. घटनेबद्दल माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तरुणी येथे एकटीच राहत होती. तर कुटुंबातील सदस्य गुरूग्राममध्ये राहतात. गुरुवारी रात्री 12 वाजता तिने आपला शाळेतील मित्र (Called School Friend) विजय साहू याला फोनवर व्हिडीओ कॉल केला. यादरम्यान विजय कुटुंबातील सदस्यांसह मध्य प्रदेशातील सिंगरोलीतून मल्हारला परतत होता. इंजिनिअरने गळ्यास दोरी टाकली होती. ती विजयला म्हणाली की, ती आत्महत्या करीत आहे.

हे ही वाचा-बाळासाठी 16 महिन्यांची कैद; नागपूरच्या तरुणीसोबत घडला थरकाप उडवणारा प्रकार

गळफास पाहून विजय आणि त्याच्या कुटुंबीय घाबरले. त्यांनी तरुणीला विनंती केली. याशिवाय मन हलक करण्यास सांगितलं. यादरम्याम विजय आणि त्याच्या कुटुंबीय महिलेला समजावण्याचा प्रयत्न करीत होते. फोन कट होताच विजयने याबाबत शशीच्या कुटुंबीयांना माहिती दिली. सोबतच सकरी पोलिसांना याबाबत कळवलं. पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचली तेव्हा इंजिनिअर महिलेले गळफास घेतला होता आणि तिचा मृतदेह घरात लटकत होता. यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. याशिवाय महिलेचा मोबाइलदेखील ताब्यात घेण्यात आला. अद्याप तिचे आत्महत्येचे कारण समोर आलेलं नाही.

First published:

Tags: Suicide case