बांदा, 12 ऑक्टोबर : कडक कायदे करुनही उत्तर प्रदेशात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वारंवार समोर आहे. (Crime Against Women) घरगुती हिंसाचाराबरोबच बलात्काराच्या सारख्या घटनांमुळे आधीच उत्तर प्रदेश हादरला आहे. त्यात बांदा (Banda) या भागात 27 वर्षीय तरुणीचं निर्वस्त्र अवस्थेतील मृतदेह सापडला आहे. तरुणीच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा आहेत. ही घटना उत्तर प्रदेशातील बदौसा पोलीस ठाणे हद्दीतील आहे. या प्रकरणात पोलिसांकडून तयास सुरू आहे. पोलिसांचा पती आणि सासरच्या लोकांवर हत्या केल्याचा संशय आहे.
ज्या देशात महिलांची देवी म्हणून पूजा केली जाते, तेथे लहानलहान मुलींवर बलात्कार केला जात आहे. पुन्हा एकदा अत्यंत निदर्यी आणि क्रुर अशी घटना समोर आली आहे. ही घटना बदौसा पोलीस ठाणे हद्दीतील बंगालीपुरा गावातील आहे. येथे सोमवारी सकाळी 27 वर्षीय तरुणीचा मृतदेह शेतात दिसला. महिलाच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमांच्या खुणा आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार तरुणीचे डोळेही फोडण्यात आले आहे. सूचना मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. तरुणीचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पती व सासरच्या मंडळींनी ही हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सध्या तरुणीचा पती फरार आहे.
हे ही वाचा-अंगणात वाहत होता रक्ताचा पाट; नेत्यासह कुटुंबाची गळा चिरून हत्या, परिसरात खळबळ
पती व सासूवर संशय
एएसपी महेंद्र प्रताप यांनी सांगितले की, साधारण 26 ते 27 वर्षांच्या तरुणीची हत्या करून तिला शेतात फेकून देण्यात आलं. महिलेचा मृतदेह तिच्या घरापासून 500 मीटर अंतरावर सापडला. प्राथमिक चौकशीनुसार तरुणीचं तिच्या सासूसोबत वाद सुरू होता. घटनेनंतर पतीदेखील फरार आहे. या प्रकरणाचा तपास करीत पुढील कारवाई करण्यात येणार आहे.