मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /सततच्या रडण्याला वैतागली आई; बाळाचं तोंड बंद करण्यासाठी केलं गंभीर कृत्य

सततच्या रडण्याला वैतागली आई; बाळाचं तोंड बंद करण्यासाठी केलं गंभीर कृत्य

मुलांनी पालकांना कितीही त्रास दिला, तरी आई कधीही आपल्या मुलांसोबत वाईट कृत्य करत नाही. परंतु, आपल्या आसपास अशा काही दुर्मीळ घटना घडतात, की ज्यावर विश्वासच बसत नाही.

मुलांनी पालकांना कितीही त्रास दिला, तरी आई कधीही आपल्या मुलांसोबत वाईट कृत्य करत नाही. परंतु, आपल्या आसपास अशा काही दुर्मीळ घटना घडतात, की ज्यावर विश्वासच बसत नाही.

मुलांनी पालकांना कितीही त्रास दिला, तरी आई कधीही आपल्या मुलांसोबत वाईट कृत्य करत नाही. परंतु, आपल्या आसपास अशा काही दुर्मीळ घटना घडतात, की ज्यावर विश्वासच बसत नाही.

  पाटना, 14 ऑगस्ट : प्रत्येक आईला (Mother) आपलं मूल (Child) प्रिय असतं. मुलांनी पालकांना कितीही त्रास दिला, तरी आई कधीही आपल्या मुलांसोबत वाईट कृत्य करत नाही. परंतु, आपल्या आसपास अशा काही दुर्मीळ घटना घडतात, की ज्यावर विश्वासच बसत नाही. काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना बिहारमधल्या (Bihar) छपरा येथे घडली. येथे राहणारी एक महिला आपल्या लहानग्याच्या सततच्या रडण्याला वैतागली आणि तिने रागाच्या भरात आपल्या लहानग्याचं तोंड फेव्हिक्विकने चिकटवून टाकलं. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली. एखादी आई असं कृत्य कसं काय करू शकते, यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. (Mother Glued Sons Lips). सुदैवाने, हा प्रकार या मुलाच्या वडिलांच्या वेळीच लक्षात आला आणि त्यांनी त्याला रुग्णालयात नेलं.

  आवाजामुळे होत होती चिडचीड

  या प्रकरणाच्या अनुषंगाने संबंधित महिलेशी संवाद साधला असता, ती म्हणाली, 'मी मुलामुळे वैतागले होते. दूध पाजल्यानंतर, भरवल्यानंतरसुद्धा तो सातत्याने रडत असते. रात्रीच्या वेळीदेखील याच्या रडण्यामुळे मला झोप लागत नसे. पती (Husband) दिवसभर ऑफिसला जात असल्याने मी घरकाम आणि या मुलाचा सांभाळ करते. यामुळे मी दिवसभर थकून जात असे. तो सारखा रडत असल्याने मला ते सहन होत नसे. पहिल्यांदा तो शांत व्हावा यासाठी मी खूप प्रयत्न केले आणि शेवटी चिडून मी त्याचं तोंड फेव्हिक्विकने (Feviquick) चिकटवलं.'

  हे ही वाचा-वडील खात होते चणे, मुलानेही केला हट्ट; खाताच 3 वर्षांच्या बाळाचा मृत्यू!

  वडिलांच्या संशयामुळे झाले उघड

  या महिलेने मुलाचं तोंड चिकटवून टाकलं. त्यानंतर काही वेळाने तिचा पती घरी परतला. बराच वेळ त्याला मुलाचा आवाज ऐकायला मिळाला नाही. त्यामुळे काहीतरी गडबड असल्याचं त्याला जाणवलं. मुलाजवळ गेल्यानंतर त्याने जे दृश्य पाहिलं, त्यामुळे तो हादरून गेला. मुलाचे ओठ चिकटवलेले होते. मुलाच्या तोंडाला डिंक लावला असल्याचं या महिलेने खोटं सांगितलं; मात्र पतीने कठोरपणे चौकशी केली असता, या महिलेने संपूर्ण घटना सांगितली.

  डॉक्टरांनाही वाटले आश्चर्य

  त्यानंतर पती तातडीने आपल्या मुलाला घेऊन रुग्णालयात गेला. मुलाची अवस्था पाहून डॉक्टरांनी आश्चर्य व्यक्त केलं. मुलाच्या या अवस्थेला त्याची आई जबाबदार आहे, असे जेव्हा लोकांना माहिती झालं तेव्हा त्यांनीदेखील आश्चर्य व्यक्त केलं. त्यानंतर डॉक्टरांनी उपचार करून त्या मुलाचे चिकटलेले ओठ मोकळे केले. हा मुलगा आता धोक्याबाहेर असून, त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

  First published:

  Tags: Crime news, Mother, Small baby