Home /News /crime /

स्वत:चा अश्लील Video शूट करून पतीला पाठवला; अन् स्वत:च केली पैशांची मागणी, भयंकर घटना 

स्वत:चा अश्लील Video शूट करून पतीला पाठवला; अन् स्वत:च केली पैशांची मागणी, भयंकर घटना 

(प्रातिनिधीक फोटो)

(प्रातिनिधीक फोटो)

हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर पतीला जबर धक्का बसला.

    पाटना, 05 जून : बिहारमधील (Bihar News) मुंगेर जिल्ह्यात राहणाऱ्या एका महिलेचं लज्जास्पद कृत्य (Shocking News) समोर आलं आहे. आपल्याच पतीकडून पैसे काढण्यासाठी महिलेने प्रियकरासोबत मिळून मोठं कारस्थान रचलं. या कारस्थानाअंतर्गत तिने स्वत:चा न्यूड व्हिडीओ शूट केला. यानंतर तिने पतीला सायबर तज्ज्ञांच्या जाळ्यात अडकल्याचं सांगितलं. सुरुवातीला पतीला चक्कर आल्याने तो बेशुद्ध पडला. नंतर कसंबसं त्याने पत्नीला दीड लाख रुपये दिले. मात्र मागणी वाढल्याने पतीची चिंता वाढली. जेव्हा पतीने पैसे देण्यास नकार दिला तेव्हा पत्नीने स्वतः त्याला तिची हकीकत सांगितली. आता पीडित पतीने न्यायासाठी पोलिसांकडे दाद मागितली आहे.  महिलेचं दोन तरुणांसोबत विवाहबाह्य संबंध होते. पत्नीला मजा-मस्तीसाठी पैशांची गरज होती. यासाठी तिने अत्यंत घाणेरडा प्लान केला. यानुसार, तिने पतीकडून पैसे उकळण्याचं कारस्थान रचलं. या कामासाठी  तिने आपला प्रियकर राजूची मदत घेतली. पत्नीने पतीची फसवणूक करण्यासाठी प्रियकर राजूला भेटून स्वत:चा अश्लील व्हिडिओ शूट केला. त्यानंतर काही सायबर तज्ज्ञाच्या जाळ्यात अडकल्याचे सांगून पतीकडून दीड लाख रुपये उकळले आणि व्हिडिओ कॉलदरम्यान अश्लिल व्हिडिओ बनवला. महिलेने नवऱ्याची माफी मागितली आणि सायबर तज्ज्ञाला दीड लाख रुपये दिल्यास तो व्हिडिओ डिलीट करू, असे सांगितले. पत्नीची इज्जत वाचवण्यासाठी पतीने दीड लाख रुपये दिले. पण खेळ इथेच हे प्रकरण थांबलं नाही. दीड लाख रुपये मिळाल्यानंतर पत्नीने आणखी 50 हजार रुपयांची मागणी केली. मात्र पतीने आणखी पैसे देण्यास नकार दिला. यानंतर पत्नीने आपलं खरं रूप दाखवलं. शेवटी तिने पतीला सांगितलं की, व्हिडीओ शूट करणारा सायबर एक्सपर्ट नाही तर माझा प्रियकर आहे. जर पैसे दिले नाही तर तो माझा व्हिडीओ व्हायरल करेल. या सर्व प्रकारानंतर पतीने पोलीस ठाण्यात धाव घेतला. आणि घडलेला प्रकार सांगितला.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Bihar, Crime news

    पुढील बातम्या