फुलं टाकायला वाशीच्या पुलावर गेल्या अन् चक्कर आली, नवी मुंबईतील थरारक घटना

फुलं टाकायला वाशीच्या पुलावर गेल्या अन् चक्कर आली, नवी मुंबईतील थरारक घटना

  • Share this:

नवी मुंबई, 29 नोव्हेंबर : फुलं वाहत्या पाण्यात टाकण्यासाठी आले असता अचानक चक्कर येऊन एक महिला खाडी पडल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईतील वाशी पुलावर (vashi bridge) घडली आहे. सुदैवाने  पोलीस (Navi Mumbai Police) कर्मचाऱ्यांनी वेळीच धाव घेऊन या महिलेला सुखरुप वाचवले आहे. पोलिसांच्या या धाडसी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी 12.40 वाजेच्या दरम्यान वाशी खाडी पुलावर ही घटना घडली. हिराबेन लक्ष्मीदास कटरमल(वय 45, राहणार, असल्फा, घाटकोपर) असं या महिलेचं नाव आहे.  हिराबेन कटारमल या आपल्या मुलीला भेटण्यासाठी कोपरखैरणे इथं आल्या होत्या. त्यांच्याकडे देवपुजेची फुलं होती. वाहत्या पाण्यात फुलं टाकण्यासाठी त्या वाशीच्या पुलावर आल्या होत्या. मात्र, त्याच वेळी अचानक चक्क आल्यामुळे त्या खाडीत पडल्या. पुला शेजारी असणाऱ्या स्थानिकांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी तातडी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

खाडी पुलाच्या मध्यभागी एका महिलेने पाण्यात उडी मारली आहे. असा नियंत्रण कक्षाकडून संदेश प्राप्त झाला. त्यावरून वाशी पोलीस ठाणे बीट मार्शल-1 चे कर्मचारी, वाशी चेक पोस्ट वरील पो.उ.नि. गुरव व कर्मचारी, सागरी सुरक्षा शाखेचे कर्मचारी यांनी लगेचच तत्परतेने स्थानिक मच्छीमार जीव रक्षक महेश अशोक सुतार यांच्या बोटीने  समुद्रात जाऊन पाण्यात बुडणाऱ्या महिलेला पाण्यातून वाचवून बाहेर आणले.

पोलिसांनी या महिलेची चौकशी केली असता त्यांनी आपल्यासोबत घडलेली हकीकत सांगितली.  सदर महिलेचे नातेवाईक हिरज कानजी कटारमल (वय 43)  हे ठाण्यात हजर झाले होते.  हिराबेन त्यांच्याकडे कोपरखैरणे येथे भेटण्यासाठी येत असल्याचे सांगितले.

हिराबेन यांची प्रकृती व्यवस्थित असून त्यांची वैद्यकीय तपासणी करिता मनपा वैद्यकीय रुग्णालय ऐरोली येथे पाठविण्यात आले होते. वैद्यकीय तपासणीनंतर हिराबेन यांना पती लक्ष्मीदास कानजी कटारमल व मुलगा जिग्नेश कटारमल यांच्याकडे देण्यात आले. वाशी पोलीस तसंच सागरी सुरक्षा शाखेचे पोलीस आणि स्थानिक मच्छीमार यांनी तत्परतेने कारवाई केल्याने महिलेचा जीव वाचवू शकला, त्यामुळे कटारमल कुटुंबीयांनी पोलीस दलाचे आभार मानले आहे.

Published by: sachin Salve
First published: November 29, 2020, 5:54 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading