मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /नवरा-बायकोच्या भांडणाने गाठलं टोक; स्वत:ला पेटवून दारात उभ्या असलेल्या नवऱ्याला मारली मिठी

नवरा-बायकोच्या भांडणाने गाठलं टोक; स्वत:ला पेटवून दारात उभ्या असलेल्या नवऱ्याला मारली मिठी

रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील कुळवंडी-देऊळवाडी या ठिकाणी नवरा बायकोचं भांडण विकोपाला जाऊन बायकोने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतल्याची घटना समोर आली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील कुळवंडी-देऊळवाडी या ठिकाणी नवरा बायकोचं भांडण विकोपाला जाऊन बायकोने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतल्याची घटना समोर आली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील कुळवंडी-देऊळवाडी या ठिकाणी नवरा बायकोचं भांडण विकोपाला जाऊन बायकोने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतल्याची घटना समोर आली आहे.

रत्नागिरी, 24 मार्च : रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील कुळवंडी-देऊळवाडी या ठिकाणी नवरा बायकोचं भांडण विकोपाला जाऊन बायकोने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतल्याची घटना समोर आली आहे. मात्र हा प्रकार इथवरच थांबला नाही तर तिने त्यावेळी घराबाहेर काही अंतरावर उभा असणाऱ्या आपल्या नवऱ्याला देखील पेटलेल्या अवस्थेत मिठी मारली. या प्रकारात त्या महिलेचा 99 टक्के भाजून मृत्यू झाला तर तिचा नवरा देखील 60 टक्के भाजून गंभीर जखमी झाला आहे.

ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली. शिल्पा मंगेश निकम (वय 40) असे मृत झालेल्या महिलेचे नाव असून तिचा नवरा मंगेश बाळाराम निकम हा देखील गंभीररीत्या भाजल्याने त्याला खेडमधील एका खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले आहे.

दरम्यान या प्रकारामुळे गावात आणि संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. नवरा बायकोची भांडणे इतक्या विकोपाला का आणि कशी गेली, पत्नीनेच स्वतःला पेटवून घेत आपल्या नवऱ्याला मिठी का मारली, दोघांमध्ये नेमकं काय घडलं, याचा तपास खेड पोलीस करत आहेत.

पोलिसांकडून आणि स्थानिक ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत शिल्पा मंगेश निकम या कुळवंडी गावच्या माजी सरपंच आहेत. त्यांच्यात आणि त्यांच्या नवऱ्यामध्ये काही दिवसांपासून काही कारणास्थव भांडणं सुरू होती. सोमवारी मध्यरात्री देखील त्यांच्यामध्ये वाद झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मंगेश निकम हे रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास घराबाहेर जाऊन उभे राहिले.

हे ही वाचा-'काही लक्षात राहत नाही, झोप लागत नाही', कोरोना झालेल्या डॉक्टराची आत्महत्या

त्यांची भांडणे इतकी विकोपाला गेली की शिल्पा निकम यांनी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले आणि पेटलेल्याच अवस्थेत पळत जात घराबाहेर काही अंतरावर उभ्या असणारी मंगेश निकम या तिच्या नवऱ्याला मिठी मारली. प्रचंड आरडाओरड झाल्यानंतर वाडीतील लोकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली आणि दोघांनाही लागलेली आग विझवली. या भीषण प्रकारात शिल्पा निकम या 90 टक्के भाजल्याने त्यांना शेजारील लोकांनी दवाखान्यात नेत असतानाच त्यांचा कशेडी घाटात मृत्यू झाला  तर तिचा नवरा मंगेश निकम हा देखील 60 टक्के भाजल्याने त्याला तत्काळ एसएमएस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. शिल्पा निकम यांचा मृतदेह कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. तर मंगेश निकम यांची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले आहे. गावकऱ्यांची आणि त्यांच्या नातेवाईकांची रुग्णालयाबाहेर एकच गर्दी केली होती.

First published:
top videos

    Tags: Fire, Wife and husband