रतलाम, 20 जानेवारी : घरांमध्ये नवरा-बायकोंमध्ये (Husband and Wife disputes) वाद होत असतो. मात्र कौटुंबिक वादात जर पत्नीने पतीचं बिंग फोडलं तर याला तुम्ही काय म्हणाल? आणि साधंसुधं बिंग नाही तर ज्यामुळे त्याला थेट तुरुंगवासच होईल. पती आता फरार झाला आहे. मात्र शहरभरात या धाडसी पत्नीची मोठी चर्चा सुरू आहे.
रतलाममध्ये 15 वर्षांपासून नवरा-बायकोंमध्ये सुरू असणारा वाद आज अन्न व औषध विभागाच्या छाप्यापर्यंत पोहोचला. मिळालेल्या माहितीनुसार रतलाममधील एका पत्नीने पतीच्या त्रासाला कंटाळून एक मोठं पाऊल उचललं. तिने तूपात भेसळ करणाऱ्या आपल्या पतीचं बिंग फोडलं. तिने याबाबत थेट अन्न आणि औषध विभागाला माहिती दिली. त्यानंतर या दुकानावर छापेमारी करण्यात आली आणि 38 किलो तूपाचे सॅम्पल जप्त करण्यात आले आहेत. या सर्व प्रकरणात पती मात्र फरार झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोमिनपुरामध्ये पतीसोबत वाद केल्यानंतर गर्दी जमा झाल्याची माहिती मिळाली होती. येथे पोलिस पोहोचले आणि त्यांनी पती-पत्नीची समजून घालून निघून गेले. रात्री 10.30 वाजता पुन्हा दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती मिळाल्यावर पोलीस पोहोचले. यावेळी पत्नीने पती हा भेसळयुक्त तूप तयार करीत असल्याची माहिती दिली. यानंतर अन्न व औषध विभागाने कारवाई करीत येथील माल जप्त केला.
हे ही वाचा-गर्लफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी स्वत:च्याच हत्येचं रचलं कारस्थान; पोलीसही हैराण!
पत्नी मीना व्यास हिने सांगितले की, 15 वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. त्यांना दोन मुले आहेत. लग्नानंतर सासू-सासरे आणि नवऱ्यात छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडण व्हायचे. पती किराणा दुकान चालवतो. मीना ही घरीच ब्युटी पार्लर चालवते.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.