मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

आवडता शर्ट घातला नाही म्हणून पत्नी रागावली; पतीला ऑफिसमध्ये आला तिच्या मृत्यूचा कॉल

आवडता शर्ट घातला नाही म्हणून पत्नी रागावली; पतीला ऑफिसमध्ये आला तिच्या मृत्यूचा कॉल

पती ऑफिसमध्ये गेल्यानंतर अर्ध्या तासाने त्याला कॉल आला आणि...

पती ऑफिसमध्ये गेल्यानंतर अर्ध्या तासाने त्याला कॉल आला आणि...

पती ऑफिसमध्ये गेल्यानंतर अर्ध्या तासाने त्याला कॉल आला आणि...

  • Published by:  Meenal Gangurde

राजस्थान, 22 ऑक्टोबर : राजस्थानमधील (Rajasthan News) कोटाच्या आरके पुरम पोलीस ठाणे हद्दीत 23 वर्षांच्या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या (Wife Suicide) केल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. मृत अंजली सुमन ही कोटामधील रामचंद्रपुरा येथील राहणारी होती. 2 वर्षांपूर्वी मध्यप्रदेशातील मंदसोर निवासी शुभमसह तिचं लग्न झालं होतं. मात्र शुभम हा कोटामध्ये नोकरी करीत होता. (The wife committed suicide out of anger as she did not wear her favorite shirt ) मंगळवारी तिने पतीला तिच्या आवडीचा शर्ट घालण्यास सांगितलं. ज्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. पती न जेवताच घराबाहेर निघून गेला. ज्यानंतर अंजलीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत तरुणीचा पती शुभमने सांगितलं की, तो एका खाजगी कंपनीत काम करतो. आरके पुरम येथील भागात भाड्याच्या घरात पत्नी आणि बहिणीसोबत राहतो. मंगळवारी पत्नीने तिच्या आवडीचं शर्ट घालण्यासाठी सांगितलं होतं. ती नवीन शर्ट शिवून घेण्यासाठीदेखील सांगत होती. यावर दोघांमध्ये वाद झाला. यानंतर त्याने बाईकची किल्ली मागितली आणि काहीही न खाता घरातून कामासाठी निघून गेला. फोनवर म्हणाला, मला बोलायचं नाही.. ड्यूटीवर गेल्यानंतर पत्नीने पतीला फोन केला आणि म्हणाली की, मला तुमच्याशी बोलायचं आहे. मात्र शुभमने तिच्याशी बोलण्यास नकार दिला आणि ड्यूटीवरून आल्यानंतर बोलतो असं सांगितलं. अर्ध्या तासानंतर शेजारच्यांचा फोन आला की, पत्नीने गळफास घावून घेतला आहे. हे ही वाचा-13 वर्षांनी लहान प्रियकरासोबत महिला फरार; जाताना घराची भयावह अवस्था, पतीही शॉक पोलिसांकडून तपास सुरू.. आरके पुरम पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल रामबाबू यांनी सांगितलं की, मेडिकल बोर्डाने पोस्टमॉर्टम केलं आहे. यानंतर बुधवारी मृतदेह कुटुंबाकडे सोपवण्यात आला. मृत तरुणीच्या माहेरच्या मंडळींनी या प्रकरणात कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.

First published:

Tags: Rajasthan, Suicide, Wife and husband

पुढील बातम्या