Home /News /crime /

ATM च्या बाहेर चोर करीत होता पूर्वतयारी, खिशात ब्रँडेड टुथपेस्ट पाहून पोलिसही पडले चाट!

ATM च्या बाहेर चोर करीत होता पूर्वतयारी, खिशात ब्रँडेड टुथपेस्ट पाहून पोलिसही पडले चाट!

 आरोपी हे खिशामध्ये स्किमर घेवून एटीएम सेंटरवर रक्कम काढण्यास आलेल्या नागरिकाचे एटीएम कार्ड पिन नंबर चोरून बघून

आरोपी हे खिशामध्ये स्किमर घेवून एटीएम सेंटरवर रक्कम काढण्यास आलेल्या नागरिकाचे एटीएम कार्ड पिन नंबर चोरून बघून

एटीएममध्ये चोरी (ATM theft) करण्यासाठी आलेल्या चोराला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं आहे. आरोपी चोरी करण्याआधी पूर्वतयारी (Crime News) करीत होता.

    रोहतक, 7 जानेवारी : हरियाणा राज्यातील रोहतक शहरात एटीएममध्ये चोरी (ATM theft) करण्यासाठी आलेल्या चोराला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं आहे. आरोपी चोरी करण्याआधी पूर्वतयारी (Crime News) करीत होता. चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्याला टुथपेस्ट लावत होता. त्याच वेळी पोलीस तेथे दाखल झाले. पोलिसांनी त्याच्याकडून हत्यारं जप्त केली. याशिवाय आरोपीची चौकशी केली जात आहे. हेड कॉस्टेबल सोनूने सांगितलं की, शुक्रवारी सकाळी पाच वाजता जेव्हा ते सेक्टर-1 मार्केटमध्ये साथीदारांसह गस्त घालत होता. तेव्हा एक्सिस बँकेच्या एटीएममध्ये एक तरुण संशयास्पद कृत्य करीत असताना दिसला. जवळ जाऊन पाहिलं तर तरुण एटीएमच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर लेप लावत होता. आणि कागद चिकटवत होता. त्याच वेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला. तरुणाजवळ लोखंडाचं हत्यार सापडलं असून ते ताब्यात घेण्यात आलं आहे. चोराजवळ एका ब्रँडेड कंपनीची टूथपेस्ट मिळाली आहे. आरोपीने आपलं नाव दीपक असल्याचं सांगितलं आहे. हे ही वाचा-फिरवण्याच्या बहाण्याने धुळ्यातील तरुणीवर कारमध्येच विकृत कृत्य; आरोपीला अटक कॅश चोरण्याचा होता हेतू.. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान आरोपीने सांगितलं की, सीसीटीव्ही कॅमेरा बंद केल्यानंतर स्कू ड्रायव्हरच्या मदतीने तो एटीएम उघडणार होता. यानंतर एटीएममधून सर्व कॅश जप्त करण्याचा प्लान होता. या प्रकरणात पोलीस तपास करीत आहे.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Haryana, Theft

    पुढील बातम्या