Home /News /crime /

लुटमारीच्या उद्देशाने घरात घुसला चोर; एकट्या महिलेला पाहाताच बदललं मन आणि...

लुटमारीच्या उद्देशाने घरात घुसला चोर; एकट्या महिलेला पाहाताच बदललं मन आणि...

एक चोर (Thief) चोरी करण्याच्या उद्देशानं घरामध्ये घुसला. घरात सामान शोधताना त्याची नजर तिथेच झोपलेल्या महिलेवर पडली. यानंतर चोरानं जे केलं ते थक्क करणारं होतं.

    वाराणसी 27 मार्च : उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एक चोर (Thief) चोरी करण्याच्या उद्देशानं घरामध्ये घुसला. घरात सामान शोधताना त्याची नजर तिथेच झोपलेल्या महिलेवर पडली. यानंतर चोरानं जे केलं ते थक्क करणारं होतं. चोरानं चोरी सोडून या महिलेला धमकी देत तिच्यावर बलात्कार (Rape) केला आणि फरार झाला. ही घटना गाझीपूरच्या खानपूर ठाणा क्षेत्रातील आहे. बलात्काराच्या या घटनेनंतर महिलेनं पोलीस ठाण्यात याविरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आणि शुक्रवारी त्याला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 मार्चच्या रात्री चोर चोरीच्या उद्देशानं घरामध्ये घुसला. मात्र, नंतर त्यानं घरामध्ये झोपलेल्या महिलेवर बलात्कार केला आणि तो घटनास्थळावरुन फरार झाला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणाचा तपास करणं पोलिसांसाठीही अत्यंत कठीण होतं. मात्र, पोलिसांनी इलेक्ट्रॉनिक पाळत ठेवत आणि माहिती देणाऱ्या खबऱ्यांच्या आधारे हे प्रकरण सोडवलं. पोलिसांनी आरोपीचा तपास सुरुच ठेवला. अखेर शुक्रवारी सकाळी आरोपीला अचक करण्यात पोलिसांना यश आलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान आरोपीनं आपलं नाव अनिल यादव असं सांगितलं आहे. तो खानपूर क्षेत्रातील रहिवासी आहे. त्यानं पोलिसांसमोर आपला गुन्हा मान्य केला आणि सांगितलं की तो चोरी करण्याच्या उद्देशानं घरात घुसला होता. मात्र, महिलेला जीवे मारण्याची धमकी देत त्यानं हे घाणेरडं कृत्य केलं. एसपी ओमप्रकाश सिंह यांनी सांगितलं, की घटनेवेळी वापरला गेलेला लोखंडी गज, मोबाईल आणि कपडे पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. आरोपी अटक करण्यात आली आहे. याशिवाय त्यांनी या प्रकरणाचा खुलासा करणाऱ्या पोलिसांच्या टीमला 10 रुपयांचा पुरस्कारही दिला आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Rape case, Thief

    पुढील बातम्या